खुल्या मनाने जनादेश स्वीकारा; अधिवेशनात CM Devendra Fadanvis यांची विरोधकांना टोलेबाजी

42
खुल्या मनाने जनादेश स्वीकारा; अधिवेशनात CM Devendra Fadanvis यांची विरोधकांना टोलेबाजी
खुल्या मनाने जनादेश स्वीकारा; अधिवेशनात CM Devendra Fadanvis यांची विरोधकांना टोलेबाजी

विरोधकांनी ईव्हीएमवर व्यक्त केलेल्या शंकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मी आधुनिक अभिमन्यू आहे. विरोधकांनी मला टार्गेट केल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला मतदान केले. विरोधक निकाल आपल्या बाजुने लागला की जनतेचा कौल आणि विरोधात गेला की ईव्हीएमवर (EVM) आरोप करतात. आत्मचिंतन करत नाही, तोपर्यंत तुमची अशीच गत होणार आहे. जनतेने आम्हाला मतदान दिले आणि निवडून आणले. आता खुल्या मनाने जनादेश स्वीकारा, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला. नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या हिवाळी अधिवेशनाचा १९ डिसेंबर रोजी चौथा दिवस आहे. या वेळी देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी सभागृहात विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले.

(हेही वाचा – Border-Gavaskar Trophy : भारतीय संघ ब्रिस्बेन मधून मेलबर्नला रवाना)

…तोपर्यंत तुम्हाला आत्मपरीक्षण करता येणार नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले की, 8 दिवसांत ईव्हीएम हॅक करून दाखवावे, असे खुले आव्हान निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना दिले होते. परंतु, एकही राजकीय पक्ष तिथे गेला नाही. तुम्ही ईव्हीएमबाबत बाहेर बोलता, पण निवडणूक आयोगाने आव्हान दिल्यानंतर कुणीही गेले नाही. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, खुल्या मनाने जनादेश स्वीकारा. जोपर्यंत तुम्ही आत्मपरीक्षण करणार नाही, तोपर्यंत तुमची परिस्थिती अशीच होत राहील. गालिब ता उम्र यह भूल करता रहा धुल चेहरे पर थी, आईना साफ करता राहा, तुम्ही जोपर्यंत तुमचा चेहरा साफ करणार नाही तोपर्यंत तुम्हाला आत्मपरीक्षण करता येणार नाही. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आम्ही आत्मपरीक्षण केले; पण आम्ही ईव्हीएमला दोष दिला नाही. फेक नरेटीव्ह होता, त्याविरोधात थेट नरेटीव्हने उत्तर देऊ, असे आम्ही सांगितले होते. आम्ही मेहनत केली, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शरद पवार पहिल्यांदा ईव्हीएमवर बोलले

मारकडवाडीत (Markadwadi) झालेल्या प्रकारावरही या वेळी मुख्यमंत्र्‍यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, विरोधकांनी फेक नरेटीव्ह फॅक्टरी उभी केली आहे. हा फेक नरेटीव्ह उद्ध्वस्त करण्यासाठी मी उभा आहे. मारकडवाडीत बॅलेटपेपरवर मतदान करण्यासाठी लोकांना धमकावण्यात आले. लोकांना धमकावल्याची ऑडिओ क्लिप आमच्याकडे आहे. मारकडवाडीवरील शरद पवारांच्या भूमिकेबद्दल मला आश्चर्य वाटले. शरद पवार पहिल्यांदा ईव्हीएमवर बोलले. राम सातपुते सारखा सामान्य कार्यकर्ता पाच वर्ष राबतो. एकट्या मारकडवाडीत 22 कोटींची कामे करतो. त्याला जास्त मते मिळाल्यावर तुम्ही लोकांना धमकावता. हे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. बॅलेटचे वोटिंग घ्यायचे. त्यात मतदान पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाले पाहिजे. ही कोणती पद्धत आहे? ही कोणती लोकशाही आहे? ही दादागिरी लोकशाहीत खपवून घेतली जाणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

आमची एकही योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत, असेही ते म्हणाले. या योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नाहीयेत. आपण ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे देत आहोत, असे स्पष्टीकरणही मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadanvis) दिले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.