सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवताना शिवसेना (उबाठा) पक्षाने बेळगावला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणी केली. शिवसेना उबाठाच्या (Shivsena-UBT) या मागणीनंतर काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदी (Laxman Savadi) यांनी आता थेट मुंबईवरच (Mumbai) दावा केला आहे. ते म्हणाले, मुंबईवर आमच्या पूर्वजांनी राज्य केले असल्याने मुंबई कर्नाटकाला देण्यात यावी, अशी मुक्ताफळे उधळत मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी सवदी यांनी केली.
( हेही वाचा : कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करण्याची Ajit Pawar यांची मागणी)
दरम्यान सवदी म्हणाले की, महाराष्ट्रातील काही मतीहीन लोक बेळगाव केंद्रशासित करावे, अशी मागणी करत आहेत. उत्तर कर्नाटकातील बेळगाव, कारवार, धारवाड हे जिल्हे मुंबई (Mumbai) प्रांताचा भार होते. त्यावेळी आमचे लोकप्रतिनिधी मुंबई विधानसभेवर निवडून जात होते. त्यामुळे मुंबईवर आमचा हक्क असून, ती कर्नाटकाला द्या. बेळगाव नव्हे मुंबई केंद्रशासित करावी, असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात यावा, असे अकलेचे तारे सवदी (Laxman Savadi) यांनी तोडले.
बेळगावातील हिवाळी अधिवेशनात आमदार सवदी (Laxman Savadi) मुंबई (Mumbai) आमची आहे. ती कर्नाटकाला द्या, मुंबई केंद्रशासित करा, बेळगाव आमचेच आहे, अशी टेप वाजवली. यंदाही त्यांनी याच मागणीचा पुनरुच्चार केला. पण यंदा त्यांच्या आधी काँग्रेसचे (Congress) विधान परिषद सदस्य नागराजू यांनी ही मागणी केली होती. त्यामुळे या नेत्यांबाबत मराठी जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांनी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा खपवून घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community