काँग्रेसने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला, असा दावा करत भाजपा (BJP) युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्यालयावर हल्लाबोल केला. त्यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी तीव्र लाठीमार केला.
युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केला आणि तोडफोड करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने अपमान केल्याचा दावा करत भाजपा कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या मुख्यालयावर हल्ला केला. भाजपाच्या (BJP) युवा मोर्चाचे कार्यकर्ते प्रेस क्लब येथील काँग्रेसच्या कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांनी सुरुवातीला राहुल गांधी यांच्या प्रतिमेवर शाहीफेक केली. त्यानंतर तेथील खुर्च्या फेकून देण्यात आल्या.
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात दगडेही मारली. दरम्यान, भाजपाच्या या आक्रमकतेची पोलिसांना माहिती मिळताच मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा काँग्रेस कार्यालयबाहेर तैनात करण्यात आला. या पोलिसांकडून भाजपाच्या (BJP) कार्यकर्त्यांवर लाठीचार्जही करण्यात आला. जमावाला पांगण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात असून त्यांची धरपकड सुरू केली.
Join Our WhatsApp Community