पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात प्रेम प्रकरणातून दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत २ तरुणांचा मृत्यू झाला आहे. बाळू सीताराम गावडे आणि राहुल दत्तात्रय गावडे अशी मयताची नावे आहेत. हा एका वीटभट्टीवर कामाला होता. या वीटभट्टीच्या मालकाची मुलगी १४ तारखेला बाळूसोबत पळून गेली. मालकाची मुलगी पळवून नेण्यासाठी बाळूला राहुलने मदत केली. यानंतर वीटभट्टी मालकाने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने दोन दिवस शोध घेत या तिघांना शोधून काढले.
लाकडी दांडके, लोखंडी रॉर्ड्सने या दोघांना बेदम मारहाण!
गुरुवारी या तिघांचा शोध लागल्यानंतर त्यांना वीटभट्टी मालकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने बेदम मारहाण केली. आरोपींनी लाकडी दांडके, लोखंडी रॉर्ड्सने या दोघांना बेदम मारहाण केली. याच मारहाणीमध्ये गंभीर जखमी झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. बाळूसोबत पळून गेलेल्या मुलीलाही मारहाण करण्यात आली आहे. ही मुलगीही जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
(हेही वाचा : कुरार व्हिलेज झोपड्यांवर कारवाई! पोलिसांकडून नागरिकांना नग्न करून मारहाण!)
पोलिसांनी मुलीच्या वडिलांसहीत सहा जणांना ताब्यात घेतले!
मयत बाळू सीताराम गावडेचा विवाह झालेला असून या दुहेरी हत्याकांड प्रकरणात त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे. संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे आणि पोलिस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या मुलीच्या वडिलांसहीत सहा जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या सहा जणांना ताब्यात घेऊन प्रकरणाची चौकशी करत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
मयत झालेले नावे
बाळू सिताराम गावडे, राहुल दत्तात्रय गावडे
मारहाण करणारे आरोपी
अनिल संभाजी कडाळे, राजू साहेबराव गावडे, किरण बाळू मेंगाळ, चंद्र करा उर्फ मुक्ता बाळू गावडे, नंदा सीताराम जाधव, बाळू मरगज हॉटेल मालक
Join Our WhatsApp Community