शिवसेनेचे मंत्री आणि नाशिकचे माजी पालकमंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे यांच्या गाडीवरती गो तस्करांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. याबाबत छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (Malegaon News)
(हेही वाचा – Bribe : २ कोटींच्या लाचप्रकरणी मुंबई महानगरपालिकेचा अधिकारी मंदार तारीला अटक)
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेत संशयित दोन वेगवेगळ्या गाडीमधून आले. त्यांना जोरजोरात हॉर्न वाजवून भुसे यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या गाडीतल्या संशयितांनी भुसे यांच्या गाडीच्या बोनेटवर आरडाओरडा करत रॉड मारला. या सर्व चकमकीत भुसे यांची गाडी डीव्हायडर मध्ये घुसून त्यांच्या गाडीचा पुढचा टायर फुटून अपघात झाला. हे संशयित गो तस्कर असल्याचा संशय आहे. त्यांचीही गाडी डीव्हायडरला ठोकल्या गेल्याने त्या ठिकाणी स्थानिक रहिवासी धावून आले. त्यानंतर त्यांनी संशयितांना पकडले. त्यातील काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. (Malegaon News)
(हेही वाचा – Jagdish Dhankar यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला)
या घटनेनंतर नागरिकांनी पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. यात एका गाडीमधून गो तस्कर करण्याचे दोर, लाठ्या काठ्या असे साहित्य आढळून आले. हे गो तस्कर असतील असा संशय स्थानिकांनी व्यक्त केला. या घटनेतील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Malegaon News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community