-
ऋजुता लुकतुके
चॅम्पियन्स करंडकाचा अडकलेला प्रश्न सोडवतानाच आयसीसीने भारत – पाक क्रिकेट संबंधांवरही अप्रत्यक्षपणे तात्पुरता तोडगा काढला आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धा हायब्रीड होणार असा निर्णय देतानाच, इथून पुढे भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांच्या देशांचा दौरा करणार नाहीत, हे मान्य करून आयसीसी स्पर्धा या देशांत होणार असतील तर या दोन देशांमधील सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. २०२४-२७ असा तीन वर्षांच्या कालावधीतील भारत आणि पाकिस्तानात होणाऱ्या स्पर्धा या हायब्रीड पद्धतीनेच खेळवल्या जातील. म्हणजे भारत – पाक सामने हे त्रयस्थ ठिकाणीच होतील. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा- ‘जाणीवपूर्वक तपासास विलंब करत आहात का?’ Akshay Shinde encounter प्रकरणी हायकोर्टाचा CID ला सवाल)
चॅम्पियन्स करंडक स्पर्धा, २०२५ मध्ये भारतात होणारा महिला टी-२० विश्वचषक आणि २०२६ मध्ये भारत आणि श्रीलंकेत संयुक्तपणे होणारा टी-२० विश्वचषक या स्पर्धा आता हायब्रीड होतील. भारतीय संघाने पाकिस्तानला न जाण्यामागे केंद्रसरकार परवानगी देत नसल्याचं कारण दिलं होतं. आयसीसीने एखाद्या देशाच्या सरकारवर खेळाडूंना पाठवण्याची सक्ती आयसीसी करू शकत नाही, अशी भूमिका यावर घेतली होती. त्यानंतर आयसीसीने सदस्य देशांशी या प्रश्नावर चर्चा केली. आणि अशा ऑनलाईन बैठकांनंतर आपली अंतिम भूमिका एक पत्रक काढून जाहीर केली. आयसीसीचं हे अधिकृत पत्रक काय सांगतं पाहूया, (Champions Trophy 2025)
ICC OFFICIAL STATEMENT
ICC Men’s Champions Trophy 2025 to be played across Pakistan and a neutral venue
India and Pakistan matches hosted by either country at ICC Events during the 2024-2027 rights cycle will be played at a neutral venue, the ICC Board confirmed on Thursday, 19… pic.twitter.com/SGAyn73A9z
— Shahzaib Ali 🇵🇰 (@DSBcricket) December 19, 2024
‘२०२४ ते २०२७ या कालावधीत आयसीसीकडून आयोजित केल्या जाणाऱ्या आणि भारत किंवा पाकिस्तान यजमान देश असलेल्या स्पर्धेत भारत किंवा पाकिस्तान एकमेकांच्या देशांचा दौरा करणार नाहीत. उभय संघांचे सामने त्रयस्थ ठिकाणी होतील. आगामी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा (यजमान – पाकिस्तान), आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक (यजमान – भारत) आणि २०२६ मध्ये होणारी आयसीसी टी-२० विश्वचषक यजमान – भारत व श्रीलंका) या स्पर्धांसाठी हा निर्णय लागू होईल. २०२८ च्या महिला टी-२० विश्वचषकाचं यजमानपद पाकिस्तानला बहाल करण्यात आलं आहे. तिथेही हायब्रीड मॉडेलचाच वापर होईल. २०२९ ते २०३१ या कालावधीत ऑस्ट्रेलियातही एक महिला विश्वचषक स्पर्धा होणार आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धा फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये होणार असून तिचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. या स्पर्धेत अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे संघ सहभागी होतील.’ (Champions Trophy 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community