मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी (२० डिसेंबर) बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याकांडावर सविस्तर निवेदन केले. त्यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, या प्रकरणाची सर्वच पाळेमुळे खोदणार असल्याचे सांगितले. आरोपींवर मकोकांतर्गत कारवाई करण्याची घोषणाही फडणवीस यांनी यावेळी केली.(CM Devendra Fadnavis)
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बीडच्या (Beed) मस्साजोगमध्ये एक गंभीर घटना घडली. संतोष अण्णा देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. इथपर्यंत हे प्रकरण मर्यादित नाही. या प्रकरणाची पाळेमुळे खोदावी लागतील. त्यातून बीड जिल्ह्यात ज्या प्रकारे लॉसनेसची परिस्थिती पहायवास मिळत आहे, ती परिस्थिती आपल्याला संपवावी लागेल.”(CM Devendra Fadnavis)
हेही वाचा-Jaipur Chemical tanker Explosion : केमिकल टँकरच्या भीषण स्फोटात ५ जणांचा होरपळून मृत्यू
“आवाडा एनर्जी कंपनीने एक मोठी गुंतवणूक हरित ऊर्जा प्रकल्पात बीड जिल्ह्यात केली आहे. त्यातून स्थानिकांना मोठा रोजगार उपलब्ध होत आहे. यामुळे काही लोक ही कामे आम्हालाच द्या, आम्ही म्हणू त्या रेटनेच द्या आणि देणार नसाल तर आम्हाला खंडणी द्या, अशा प्रकारच्या मानसिकेत वावरत आहेत. साधारणतः 6 डिसेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान मस्साजोग येथे आवाड ग्रीन एनर्जीच्या कार्यालयावर अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले आदी आरोपी चालून गेले. प्रथम त्यांनी तेथील वॉचमन अमरदिप सोनवणे याला मारहाण केली. त्यानंतर तेथील सीनिअर मॅनेजर शिवाजीराव थोपटे यांना शिवीगाळ मारहाण केली. त्यानंतर वॉचमनने स्थानिक सरपंच संतोष देशमुख यांना माहिती दिली. त्यानंतर देशमुख घटनास्थळी गेले तेव्हा त्यांना मारहाण झाली.”(CM Devendra Fadnavis)
सिनियर प्रोजेक्ट मॅनेजरला त्यांनी मारहाण केली. मारहाण झाल्यामुळे पीडितांनी सरपंचांना कॉल केला. बाजुच्या गावातील आरोपी मारहाण करत असल्याने सरपंच आले. दादागिरी करत असल्याने सरपंचांच्या लोकांनी चोप दिला, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. 9 डिसेंबरला संतोष अण्णा चारचाकी वाहनातून गावी परत जात होते. ते एकटेच होते. पेट्रोल पंपावर आतेभाऊ भेटले, त्यांना सोबत घेऊन निघाले. टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची स्कॉर्पिओ व एक गाडी वाट पाहत होती. टोल नाक्यावर जाताच त्यांनी गाडी अडवली. काच फोडून त्यांना बाहेर काढले, स्कॉर्पिओ गाडीत टाकून मारहाण केली.तारांनी गुंडाळून मारहाण केली. गाडीतून उतरवत मारहाण केली. ते मृत झाल्यावर हे सर्व लोक पळाले, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.(CM Devendra Fadnavis)
हेही वाचा-Champions Trophy 2025 : आयसीसीच्या पत्रकात भारत – पाक क्रिकेटविषयी नेमकं काय म्हटलंय?
सरपंचांचा भाऊ हा सातत्याने विष्णू महादेव चाटेच्या संपर्कात होता. 15 ते 20 मिनिटांत सोडतो असे सांगत होता. पण सोडले नाही. प्रचंड मारहाण केली त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. सुरेश धस यांनी मुद्दा मांडला, त्यांचे डोळे जाळले नाही, डोळ्यावर मारहाण केलेली आहे. पण ही निर्घृण हत्या आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.(CM Devendra Fadnavis)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community