लाडक्या बहिणींना सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम करणार; Dr. Neelam Gorhe यांचे प्रतिपादन

शिवसेना महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपसभापतींच्या मार्गदर्शनात स्नेहसंवाद बैठक!

53
लाडक्या बहिणींना सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम करणार; Dr. Neelam Gorhe यांचे प्रतिपादन

नागपूर हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्याकरिता आलेल्या सर्व महिला पदाधिकारी तसेच नागपूर महिला आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी गुरूवार दि. १९ डिसेंबर २०२४ रोजी स्नेहसंवाद बैठकीचे आयोजन केले होते. नवीन ‘४ थे महिला धोरणा’चा आढावा त्याचबरोबर महिलांचे मुद्दे यासंदर्भात डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांशी संवाद साधला.

कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी जेव्हा आपल्या मागण्या, समस्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांच्या समोर मांडल्या त्यावेळी त्यांनी या महिलांना मार्गदर्शनही केलं. डॉ. नीलम गोऱ्हे या नेहमीच महिलांसाठी लढत असतात त्यांनी घेतलेले निर्णय हे महिलांचे सन्मान वाढवणारे असतात. जेव्हा महिलांवर अन्याय, अत्याचार होतात तेव्हा त्या धावून जातात आणि महिलांना सन्मान देणारी भूमिका घेतात. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन महिलांसाठी फायद्याचे ठरते. नागपूर, नागपूर ग्रामीण, पंढरपूर, गडचिरोली, अमरावती, सोलापूर, बीड, हिंगणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, घनसावंगी अशा वेगवेगळ्या जिल्हा आणि तालुक्यातील शिवसेना महिला जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि कार्यकर्त्या यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

(हेही वाचा – EPF Withdrawal : ईपीएफमधील पैसे आता एटीएममधून काढता येणार; काय आहे प्रक्रिया?)

त्यांचे मार्गदर्शन करताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) म्हणाल्या की, “गेल्या ४ टर्मपासून मी विधानपरिषदेमध्ये काम करते आणि आता गेल्या ५ वर्षांपासून उपसभापती म्हणून काम करते. पण तुमच्या सर्वांच्या शक्तीमुळे महिला शक्तीचा आदर करण्यासाठी मला हे स्थान दिलेलं आहे. माझं एकटीचं हे स्थान नाही, तुमच्या प्रत्येकीचं हे स्थान आहे हा आत्मविश्वास पहिला ठेवा. तुम्हाला पण तेवढीच बुद्धी आहे, कष्ट करताय, श्रम करताय, लिहिता-वाचता आहात, बचत गट करताय, पण फरक कुठे पडतोय… संधी मिळाली नाही की लगेच निराश होताय.

तुम्ही हा विचार करा की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज त्यांच्याच संपूर्ण कल्पनेतून लाडकी बहीण योजनेचा विषय निघाला. त्यावर किती टीका करण्यात येते पण अनेक महिलांना याचा फायदा झाला. ही योजना म्हणून तुम्ही शक्तीवान आहात. समजातील सत्येचं पद आणि सत्तापालट ही तुमच्या शक्तीमुळे होऊ शकते हे लाडक्या बहिणींनी दाखवून दिलं आहे. आता प्रश्न असा आहे की, पुढचं पाऊल आपलं काय असणार? आपण महिलांना योजनांविषयी माहिती देण्यासाठी एक शिबिराचे आयोजन करू. आमच्या जी कामाची पद्धत आहे त्यामध्ये आम्ही जास्त गट चर्चा घेतो आणि यामधून कार्यक्रम आखतो. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना ‘४ थे महिला धोरण’ असे महिलांसाठी धोरण तयार केले होते, हे तुम्हाला वाचायचे आहे, यातील योजनांची माहिती घ्यायची आहे.” अशा शब्दात त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

(हेही वाचा – Ashwin Retires : ‘अपमानास्पद वागणुकीमुळे अश्विनची निवृत्ती’, वडिलांचं खळबळजनक विधान; अश्विनने केली सारवासारव)

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) पुढे बोलताना म्हणाल्या की, ‘४ थे महिला धोरण’ मध्ये महिलांसाठी जवळपास ५० ते ६० योजना आणि निर्णय आहेत. आपल्याला या सगळ्या गोष्टींची माहिती झाली पाहिजे. तुम्हाला सहकार्य मिळावं या दृष्टीकोनातून अधिकाऱ्यांशी बोलून त्या शिबिरामध्ये मार्गदर्शन करू. आरोग्य शिबिरही घेता येतात, आपण त्याचीही माहिती घेऊ. सध्या आपल्या शाखा जेवढ्या पाहिजे तेवढ्या नाहीयेत त्यामुळे प्रत्येकीच्या भागात आपण शाखाप्रमुख नेमल्याच पाहिजेत. जोपर्यंत शाखाप्रमुख नेमत नाही, तोपर्यंत संघटना होणार नाही. त्यामुळे शाखांचं टार्गेट ठेवा, ते करत असताना त्या भागात कमीतकमी १०० महिलांची टीम झाली पाहिजे. त्यातील ४ ते ५ महिला सर्वसाधारण कॅटेगरी, एखादी एससी, एसटी आणि ओबीसी कॅटेगरीतील असावी. उद्या तिकीटासाठी जर जागा राखीव झाली तर आपल्याकडे जिल्हापरिषदेत, ग्रामपंचायतीत, पंचायत समितीत आणि महानगरपालिकेमध्ये उभं राहण्यासाठी त्या महिला असल्या पाहिजे”, अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी महिलांसाठी भविष्यातील धोरण मांडले.

पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख शुभांगी नांदगावकर, सोलापूर जिल्हाप्रमुख शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख आरती ओमकार बसवंती, गडचिरोली संपर्कप्रमुख वर्षा मोरे, नागपूर ग्रामीण जिल्हाप्रमुख नेहा भोकरे, नागपूर शहर जिल्हाप्रमुख अनिता जाधव, बीड सहसंपर्क प्रमुख अंजली मांडवकर, रामटेक विधानसभा उपजिल्हाप्रमुख पारशिवनी नगराध्यक्ष प्रतिभा संजय कुंभलकर, रामटेक विधानसभा जिल्हाप्रमुख करुणा आष्टणकर, छत्रपती संभाजी नगर उपजिल्हाप्रमुख जयश्री इंदापुरे या आणि अशा इतर शिवसैनिक महिलांच्या प्रमुख उपस्थितीत हा स्नेह बैठकीचा कार्यक्रम डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांच्या मार्गदर्शनात उत्तमरित्या संपन्न झाला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.