Border-Gavaskar Test, Melbourne Test : बोर्डर-गावस्कर मालिका बरोबरीत सुटली तर, कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं काय होईल?

Border-Gavaskar Test, Melbourne Test : भारतीय संघाने मालिका १-२ ने गमावली तरी भारताला संधी आहे.

43
Border-Gavaskar Test, Melbourne Test : बोर्डर-गावस्कर मालिका बरोबरीत सुटली तर, कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं काय होईल?
  • ऋजुता लुकतुके

बोर्डर-गावसकर मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे आणि मालिकेतील स्पर्धाही वाढली आहे. या मालिकेवर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांची आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील वाटचाल अवलंबून आहे. त्यामुळेही मालिकेचं महत्त्व वाढलं आहे. अशावेळी जो संघ मालिका जिकेल, त्याच्या अंतिम फेरीच्या आशा वाढतील, हे नक्की आहे. पण, ही मालिका बरोबरीत सुटली तर? अशावेळी दोन्ही संघांसाठी आणि खासकरून भारतासाठी कसोटी अजिंक्यपद अंतिम फेरी गाठण्याच्या काय शक्यता आहेत याकडे एक नजर टाकूया, (Border-Gavaskar Test, Melbourne Test)

(हेही वाचा – संतोष देशमुख प्रकरणात आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करणार; CM Devendra Fadnavis यांची घोषणा)

१. पहिली शक्यता – मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली – अशा परिस्थितीत भारताची यशाची टक्केवारी असेल ५५.२६ टक्के. भारतीय संघाचे या हंगामातील सामने संपलेले असतील. त्यामुळे या टक्केवारीसह अंतिम फेरी गाठायची असेल तर भारताला इतर मालिकांच्या निकालांवर अवलंबून राहावं लागेल.

त्यासाठी ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धची मालिका किमान ०-१ अशी हरायला हवी

आणि पाकिस्ताननेही दक्षिण आफ्रिकेचा २-० असा पराभव करावा लागेल (Border-Gavaskar Test, Melbourne Test)

(हेही वाचा – EPF Withdrawal : ईपीएफमधील पैसे आता एटीएममधून काढता येणार; काय आहे प्रक्रिया?)

२. दुसरी शक्यता – मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली – अशा परिस्थितीत भारताची यशाची टक्केवारी ५३.५१ टक्के इतकी खाली येईल आणि कसोटी अजिंक्यपद गाठण्याची शर्यत कठीण होऊन बसेल. अशावेळी स्पर्धेत श्रीलंकेचा संघही येईल. मालिकेचा निकाल १-१ असा लागला तर इतर मालिकांचा निकाल खालील प्रमाणे लागावा लागेल,

दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानविरुद्धची मालिका ०-२ अशी गमवावी लागेल

ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धची मालिका ०-० असी बरोबरीत राखावी लागेल, किंवा त्यांचा ०-१ असा पराभव व्हावा लागेल (Border-Gavaskar Test, Melbourne Test)

(हेही वाचा – Kalyan Marathi Family Case : “आता माज उतरवण्याची वेळ आलीय”, मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी मनसे आक्रमक)

मालिकेत ०-० अशी बरोबरी झाली तर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे समसमान गुण होतील. पण, भारताने ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत मालिका जास्त जिंकल्या असल्यामुळे भारताला अंतिम फेरी गाठता येईल.

ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धची मालिका ०-२ अशी गमावली, तर श्रीलंका भारत आणि ऑस्ट्रेलिया दोघांच्या पुढे जातील.

भारतीय संघाला उर्वरित दोन कसोटींमध्ये चांगली कामगिरी करावीच लागेल. आघाडीच्या फलंदाजांची कामगिरी, बुमराला इतर गोलंदाजांची मिळणारी साथ यावर संघाची कमगिरी अवलंबून असेल. भारताने ही मालिका जिंकली तर त्यांना कसोटी अजिंक्यपदाची अंतिम फेरी गाठण्याची संधी जास्त आहे. (Border-Gavaskar Test, Melbourne Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.