- ऋजुता लुकतुके
पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स करंडकाचा प्रश्न सोडवताना आयसीसीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. २०२४ ते २०२७ दरम्यान आयसीसीच्या ज्या स्पर्धा भारत किंवा पाकिस्तानमध्ये होणार असतील त्या सर्वच स्पर्धांमध्ये भारत-पाक सामने त्रयस्थ ठिकाणी होतील, असा निर्वाळा आयसीसीने दिला आहे. त्यामुळे अशा स्पर्धांमध्ये आता हायब्रीड मॉडेल अस्तित्वात येणार आहे. कुठल्याही दोन देशांमध्ये राजकीय वैमनस्य असेल किंवा एखाद्या देशात अस्थिरतेमुळे क्रिकेट सामने भरवण्यासाठी पोषक वातावरण नसेल, तर अशा देशाचा क्रिकेट स्पर्धांमधील सहभाग संपू नये यासाठी आयसीसीने हे धोरण राबवलं आहे. (Champions Trophy 2025)
अफगाणिस्तानमधील अस्थिर परिस्थितीत आयसीसीने त्यांना भारतात नॉयडा इथं सरावाचं केंद्र उपलब्ध करून दिलं होतं. आणि अफगाणिस्तान संघाच्या मालिकाही सुरक्षित अशा ठिकाणी होतील, याकडे लक्ष दिलं होतं. भारत आणि पाकिस्तानच्या संघांनी २००८ पासून एकमेकांचा दौरा केलेला नाही. गेल्यावर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला. पण, भारतीय संघाने १६ वर्षांत पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा – संतोष देशमुख प्रकरणात आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करणार; CM Devendra Fadnavis यांची घोषणा)
अशावेळी उभय देशांसाठी आयसीसी स्पर्धांसाठी इथून पुढे हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यात आलं आहे. भारत-पाक हे कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी. त्यामुळे हा सामना जगाच्या पाठीवर कुठेही झाला, तरी त्याला प्रेक्षकांची गर्दी होते आणि तो लोकप्रिय होतो. त्यामुळे आयसीसीच्या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं की, भारत-पाक सामना कधी आणि कुठे याची चर्चा होते. (Champions Trophy 2025)
पण, राजकीय वैमनस्यामुळे या देशांमधील दौरे थांबले आणि राजकारण आणि क्रिकेट वेगळं ठेवता आलं पाहिजे असा सूर याविषयी नेहमी उमटतो. पण, त्याचबरोबर अर्थातच, यामागे आर्थिक गणितंही आहेत. ही गणितं आयसीसी आणि सामन्याचं प्रक्षेपण करणाऱ्या वाहिन्यांसाठी महत्त्वाची आहेत. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा – Kalyan Marathi Family Case : “आता माज उतरवण्याची वेळ आलीय”, मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी मनसे आक्रमक)
फिकीने सादर केलेल्या अहवालानुसार, भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यांनी मागच्या २० वर्षांत तब्बल १०,००० कोटींचा महसूल मिळवून दिला आहे. सगळ्यात जास्त फायदा हा जाहिरातींमधून वाहिन्यांचा होतो. कारण, जाहिरातीच्या १० सेकंदांसाठी कंपन्या २० लाख रुपये मोजायला तयार असतात. अगदी तिकीट विक्रीतूनही यजमान देशांनी आतापर्यंत १०० दशलक्ष अमेरिकन डॉलर उभे केले आहेत आणि स्पर्धा आयसीसीची असेल तर आयसीसी आणि यजमान देशाला या नफ्यातील मोठा वाटा जातो. (Champions Trophy 2025)
आता आणखी एक गणित बघूया,
- आयसीसीच्या स्पर्धेत भारत नसेल तर स्पर्धेचं जाहिरातीतून होणारं नुकसान किती? उत्तर आहे ९० टक्के
- आयसीसी स्पर्धेत पाकिस्तान नसेल तर स्पर्धेचं जाहिरातीतून होणारं नुकसान किती? उत्तर आहे १० टक्के
- भारत पाक स्पर्धेचं आर्थिक गणित हे असं आहे. त्यावर आयसीसी आणि आयोजकांची निर्णय प्रक्रिया अवलंबून आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community