- ऋजुता लुकतुके
रवीचंद्रन अश्विनच्या अचानक निवृत्तीच्या निर्णयानंतर भारतीय संघाने आता मेलबर्न कसोटीवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रीत केलेलं असणार आहे. भारतासमोरची मुख्य समस्या आहे ती फलंदाजांच्या फॉर्मचीच. पर्थ कसोटीचा अपवाद सोडला तर भारतीय संघाची फलंदाजी मालिकेत जमून आलेली नाही. ब्रिस्बेनमध्ये राहुल, जाडेजा आणि तळाला बुमराह, आकाशदीप यांनी प्रतिकार केला. पण, पाऊस मदतीला आला नसता तर कदाचित कसोटी गमावावीच लागली असती. (Border-Gavaskar Test, Melbourne Test)
काही आकडेवारीतून समजून घेऊया या मालिकेत दोन्ही संघांच्या कामगिरीतील फरक.
(हेही वाचा – Water : मुंबईतील वाढती पाणी समस्या दूर करण्यासाठी गारगाई व पिंजळ प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याची मागणी)
या कोष्टकातून दोन्ही संघांमधील फरक स्पष्ट होतो. दोन सलामीवीरांच्या जोडीमध्ये भारतीय सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियन जोडीपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. भारतीय संघाची ४२ ही सरासरी असं सांगते की, सलामीवीरांनी नेहमीच भारताला चांगली सुरुवात करून दिली आहे. पर्थ कसोटीत तर राहुल आणि जयस्वाल यांनी २०१ धावांची विक्रमी सलामी करून दिली होती. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने सततच्या अपयशामुळे उर्वरित दोन कसोटींसाठी मॅकस्विनीला वगळण्याचा निर्णय घेतला आहे. (Border-Gavaskar Test, Melbourne Test)
(हेही वाचा – Champions Trophy 2025 : भारत-पाकिस्तान क्रिकेटमध्ये फायदा कुणाचा?)
तळाच्या फलंदाजांनीही तुल्यबळ कामगिरी केली आहे. मोठा फरक आहे तो मधल्या फळीच्या कामगिरीचा आणि इथे ३ ते ६ क्रमांकांवरील ४ फलंदाज येतात. इथं ऑस्ट्रेलियाने ६६९ धावा केल्या असताना भारतीय मधल्या फळीतील फलंदाजांनी फक्त ३३७ धावा केल्या आहेत. शुभमन गिल आणि रिषभ पंत यांची सरासरीही जेमतेम १७ धावांची आहे. विराट आणि रोहितचं अपयश आणखी सलणारं आहे. शिवाय ऑस्ट्रेलियाकडून ३ शतकं झाली असताना भारताकडून विराट कोहलीने पर्थ कसोटीत एकमेव शतक ठोकलं आहे. ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाने पराभव टाळला असला तरी मालिकेत पुनरागमन करायचं असेल तर मधल्या फळीने जबाबदारीने फलंदाजी करणं आवश्यक आहे. त्यासाठी रोहित शर्माने नेमकं कुठल्या क्रमांकावर खेळायचं याचा निर्णयही संघाला घ्यावा लागणार आहे. (Border-Gavaskar Test, Melbourne Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community