- सुजित महामुलकर
फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार गेल्या रविवारी, १५ डिसेंबर २०२४, पहिल्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झाला खरा पण खातेवाटप अधिवेशानाचा शेवटचा दिवस आला तरी झाले नाही. एका मंत्र्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की ‘आता मंत्रिमंडळ विस्तार मुंबईतच होणार’. त्यामुळे हे अधिवेशनाचे सूप बिनखात्याच्या मंत्र्यांवरच वाजणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (Assembly Winter Session)
पाच दिवसांपासून प्रतीक्षा कायम
राज्यात विधानसभा २० नोव्हेंबर २०२४ मध्ये निवडणूक झाली. २३ नोव्हेंबरला निकाल लागला. महायुतीला जनतेने भरभरून मतदान केले आणि अभूतपूर्व यश मिळाले. त्यानंतर १३ दिवसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे-अजित पवार यांनी ५ डिसेंबरला शपथ ग्रहण केली. ७ ते ९ डिसेंबर असे तीन दिवस नव्या आमदारांनी शपथ घेतली तर १५ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. मात्र मंत्रिमंडळ विस्तार होऊन आज शुक्रवारी २० डिसेंबरला पाच दिवस उलटूनही मंत्र्यांना खातेवाटप झाले नाही. (Assembly Winter Session)
(हेही वाचा – धारावी पुनर्वसन प्रकल्पविरोधी याचिका Mumbai High Court ने फेटाळली)
‘व्हॉट्सॲप’वर खातेवाटप
गेले चार दिवस माध्यमांकडून मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. ‘व्हॉट्सॲप’वर कोणाला कोणते खाते मिळाले याचे अंदाज बांधले जात असल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे ‘हिंदुस्थान पोस्ट’ने एका मंत्र्याला विचारले असता ते म्हणाले की, “आता मंत्रिमंडळ विस्तार खातेवाटप मुंबईला गेल्यावरच होईल. मंत्रालयात मंत्र्यांची दालने तयार होत आहेत. तर बहुदा पहिल्या कॅबिनेट बैठकीत खातेवाटप निश्चित करून जाहिर होण्याची शक्यता आहे.” त्यामुळे शनिवारी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही खातेवाटप होण्याची शक्यता मावळली आहे. (Assembly Winter Session)
प्रादेशिक समतोल
नागपूरमधील राजभवनात पार पडलेल्या सोहळ्या ३९ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक समतोल राखताना जातीय समीकरणेदेखील जुळवून आणली. पण विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महायुतीचे मंत्री हे बिन खात्यांचे असल्याचे दिसून येत आहे. (Assembly Winter Session)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community