Missile Company Ban: अमेरिकेकडून पाकिस्तानच्या ४ क्षेपणास्त्र कंपनीवर बंदी

70

पाकिस्तान नवीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (Ballistic missile) बनवत आहे. या क्षेपणास्त्राबाबत अमेरिकेने पाकिस्तानला जोरदार झटका देत चार कंपन्यांवर बंदी घातली आहे. लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्याच्या पाकिस्तानच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने गुरुवारी पाकिस्तानवर नवीन निर्बंध लादले आहे. अण्वस्त्रधारी पाकिस्तानने लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र विकसित केल्यास ते जगासाठी धोकादायक ठरू शकते, असे अमेरिकेचे मत आहे. त्यामुळे पाकिस्तानला आता मोठा धक्का बसला आहे. (Missile Company Ban)

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर (Matthew Miller) म्हणाले कि, ‘हे निर्बंध पाकिस्तानच्या राष्ट्रीय विकास संकुल आणि तीन कंपन्यांना लागू होतील. या निर्बंधांचा उद्देश मोठ्या प्रमाणात होणारी जीवितहानी रोखणे हा आहे. निर्बंध लागू झाल्यानंतर अमेरिकेतील बंदी घातलेल्या कॉम्प्लेक्स आणि कंपन्यांची मालमत्ता जप्त केली जाईल आणि त्यांना अमेरिकेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे व्यवसाय करता येणार नाही.याप्रमाणे त्यांच्याशी संबंधित असलेले लोकही अमेरिकेला जाऊ शकणार नाहीत. NDC व्यतिरिक्त, अमेरिकेच्या निर्बंधांच्या कक्षेत आलेल्या तीन कंपन्यांची नावे एफिलिएट्स इंटरनॅशनल, अख्तर अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि रॉकसाइड एंटरप्राइझ आहेत. या तीन कंपन्या कराची येथील आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या माहितीनुसार, इस्लामाबादस्थित NDC लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या (US bans Pakistan’s 4 missile companies) निर्मितीमध्ये गती देण्यासाठी आणि त्याच्या चाचणीसाठी आवश्यक उपकरणे मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

(हेही वाचा – Assembly Winter Session : मंत्र्यांचे खातेवाटप मुंबईतच?)

अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोनाथन फाइनर (Jonathan Finer) यांनी याबाबत भीती व्यक्त केली आहे. जोनाथन फाइनर म्हणाले, ‘पाकिस्तान जे क्षेपणास्त्र बनवत आहे ते दक्षिण आशियाबाहेर अमेरिकेवर हल्ला करण्यात यशस्वी ठरेल. त्यामुळे पाकिस्तानच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे आणि त्यांना ही क्षमता मिळण्यापासून रोखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. जागतिक शांततेसाठी आयोजित केलेल्या एका संघटनेत बोलताना फिनर म्हणाले की, पाकिस्तान अमेरिकेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतो, असे वाटणे कठीण आहे, पण ते अमेरिकेसाठी धोका निर्माण करु शकते. मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या हवाल्याने म्हटले आहे की, चार बंदी घातलेल्या कंपन्या पाकिस्तानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी आवश्यक साधने पुरवत आहेत. अमेरिका भविष्यातही अशा कारवायांविरोधात कारवाई करत राहील.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.