Drugs च्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर अखेर गुन्हा दाखल

70
Drugs च्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर अखेर गुन्हा दाखल
  • प्रतिनिधी 

एका व्यक्तीला ड्रग्जच्या (Drugs) खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी त्याच्या खिशात अमली पदार्थ ठेवल्याप्रकरणी खार पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस अधिकाऱ्यासह ४ जणांविरुद्ध वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा घडल्याच्या दिवसापासून ११२ दिवसांनी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेली नसून तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे, हवालदार इम्रान शेख, सागर कांबळे आणि शिंदे उर्फ दबंग शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांचे नावे आहेत.

(हेही वाचा – Assembly Winter Session : मंत्र्यांचे खातेवाटप मुंबईतच?)

सांताक्रूझ पूर्व कालिना या ठिकाणी डायलन एस्टबेरो या व्यक्तीची दोन एकर जमीन आहे. या ठिकाणी डायलन याने काही जनावरे पाळली असून त्या ठिकाणी डायलन यांचा मित्र शाहबाज खान हा सांभाळ करतो. या जमिनीचा विकासक आणि डायलान यांच्यात वाद सुरु आहे. ३० ऑगस्ट रोजी खार पोलीस ठाण्याचे एटीसी पथकाचे तुकाराम ओंबळे, हवालदार इम्रान शेख, सागर कांबळे आणि शिंदे उर्फ दबंग शिंदे हे त्या ठिकाणी आले होते. त्याठिकाणी शाहबाज खानकडे डायलन बाबत चौकशी केली. मात्र डायलन तिकडे नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. पोलिसांनी शहाबाज खान यांच्याकडे त्याच्या बाबत चौकशी सुरु केली. दरम्यान एका पोलीस कॉन्स्टेबलने शहाबाज यांच्या मागच्या खिशात अमली पदार्थ (Drugs) असलेले एक पॅकेट टाकून शहाबाज जमीन मालक यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र हा सर्व प्रकार त्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आणि पोलिसांचे पितळ उघडे पडले होते.

(हेही वाचा – धारावी पुनर्वसन प्रकल्पविरोधी याचिका Mumbai High Court ने फेटाळली)

या प्रकरणात पोलीस उपायुक्त (परिमंडळ-९) यांनी खार पोलीस ठाण्यातील एटीसीच्या पोलीस पथकाला निलंबित करून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचा फास आवळण्यात आला होता. अखेर ११२ दिवसांनी गुरुवारी खार पोलीस ठाण्याचे एटीसी पथकाचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे, हवालदार इम्रान शेख, सागर कांबळे आणि शिंदे उर्फ दबंग शिंदे यांच्याविरुद्ध वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अदयाप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Drugs)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.