Debris : ठाकरेंच्या मंजुरीने राबवलेल्या निविदेतील प्रकल्प कामाला उबाठाच्या माजी नगरसेवकांचा विरोध

95
Debris : ठाकरेंच्या मंजुरीने राबवलेल्या निविदेतील प्रकल्प कामाला उबाठाच्या माजी नगरसेवकांचा विरोध
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महानगरपालिकेने बांधकामाचा कचरा तसेच राडारोड्याची (Debris) विल्‍हेवाट लावण्यासाठी बांधकाम आणि पाडकाम कचरा (कन्स्ट्रक्शन अँड डिमोलिशन वेस्ट) शास्त्रोक्त प्रक्रिया प्रकल्प दहिसरमध्ये सुरु केला आहे. या प्रकल्प कामांची निविदा सन २०२०मध्ये काढण्यात आली होती आणि प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेनंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये मंजुरी देण्यात आली. त्यानंतर पश्चिम उपनगरातील राडारोड्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचे पूर्ण करून प्रत्यक्षात ऑगस्ट २०२४ मध्ये प्रत्यक्षात या प्रकल्पा राडारोडा जमा करण्यास सुरुवात होऊन नोव्हेंबरपासून प्रक्रियेला सुरुवात झाली. विशेष या प्रकल्पाची मंजुरीच राज्यातील तत्कालिन ठाकरे सरकार आणि उपनगराचे पालकमंत्री तत्कालिन आदित्य ठाकरे यांनीच मंजुरी दिलेली असताना उबाठा शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी याप्रकल्पाला विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला.

New Project 2024 12 20T213420.980

मुंबई महानगरपालिकेने दहिसर कोकणी पाडा येथील पाच एकर जागेवर पश्चिम उपनगरांतील राडारोड्यावर (Debris) प्रक्रिया करण्यासाठी पुढील २० वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. याठिकाणी ६०० मेट्रिक टन राडारोड्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जात आहे. या प्रकल्पासाठी तत्कालिन ठाकरे आणि उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंजुरीनेच निविदा मागवण्यात आली होती, परंतु, कोविडमुळे ही निविदा लांबणीवर पडली आणि कोविडची लाट गेल्यानंतर सन फेब्रुवारी २०२२ मध्ये निविदा अंतिम करून मंजुरी देण्यात आली. त्यानंतर जागेचा शोध घेऊन सर्व सोपस्कार झाल्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये कार्यादेश दिल्यानंतर दहिसर कोकणी पाड्यातील जागा उपलब्ध करून देत त्यावर हा प्रकल्प उभारण्यात आला. त्यानुसार याप्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर पश्चिम उपनगरांतील बांधकाम पाडकामाचे डेब्रिज तसेच रस्त्यालगत टाकले जाणारे रॅबिट जमा करून ठिकाणी ऑगस्ट २०२४ पासून टाकण्यात येत आहे. यावर आता प्रत्यक्षात नोव्हेंबर २०२४ पासून प्रक्रिया करण्यास सुरुवात झाली.

New Project 2024 12 20T213509.092

(हेही वाचा – Debris : मुंबईतील राडारोड्याचा असाही वापर; महापालिकेने यापासून केली वाळूची निर्मिती)

या प्रकल्पात १८ डिसेंबर २०२४ पर्यंत प्राप्त १७ हजार ६०० मेट्रिक टन राडारोड्यापैकी १६ हजार मेट्रिक टन राडारोड्यावर (Debris) शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यात आली आहे. शुक्रवारी या प्रकल्पाची माध्यमांच्या प्रतिनिधींसह पाहणी सुरु असतानाच स्थानिक उबाठा शिवसेनेचे माजी नगरसेवक व विभागप्रमुख उदेश पाटेकर आणि माजी नगरसेविका सुजाता पाटेकर हे कार्यकर्त्यांसह तिथे प्रकटले आणि एकप्रकारे याला विरोधच केला. पाटेकर यांनी या प्रकल्पाला विरोध नसून केवळ याठिकाणी येणारा दुबे मार्ग हा अरुंद असल्याने तो आधी रुंद केला जावा, तोपर्यंत हा प्रकल्पातील वाहने बंद ठेवावी, अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा दिला. परंतु एका बाजूला ही मागणी ते करतानाच त्यांनी या प्रकल्पांमुळे आजुबाजुच्या घरांमध्ये धुळ पसरत असून या धुळीचा त्रास येथील जनतेला होत असल्याचे सांगितले. हा प्रकल्प हाती घेताना आम्हाला आणि स्थानिकांना विचारात का घेतले नाही असा सवाल करत या प्रकल्पालाच आमचा विरोध असल्याचे त्यांनी पुढे सांगितले, त्यामुळे पाटेकर यांच्या विरोधातच एकवाक्यता नसल्याने त्यांचा नक्की विरोध कशाला आहे हेच अधिकाऱ्यांना कळत नव्हते. या प्रकल्पासाठी दिवसाला २० ते २५ ट्रक येणार आहेत, ते या रस्त्यावरुन कसे जाणार असाही सवाल करत पाटेकर यांनी यापुढे एकही गाडी येऊ देणार नाही असा इशारा दिला.

New Project 2024 12 20T213552.884

त्यामुळे या प्रकल्पाला विरोधाकरता विरोध करण्याचा केविलवाणा प्रयत्न पाटेकर यांनी केला असला तरी प्रत्यक्षात ठाकरेंनीच मंजुरी दिलेल्या या प्रकल्पाला विरोध करण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महापालिकेत शिवसेनेची सत्ता असतानाच याचा निर्णय घेतल्यामुळे आज सत्ता गेल्यानंतर याला विरोध करण्यासाठी पाटेकर जागे झाल्याचेही बोलले जात आहे. फेब्रुवारी २०२३ पासून या प्रकल्पाचे काम सुरु असतानाही याला विरोध न करणारे पाटेकर आता प्रकल्प सुरु झाल्यानंतर विरोधाचा सूर आळवू लागल्याने नक्की विरोध कशासाठी आणि का असा सवालच उपस्थित होऊ लागला आहे. (Debris)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.