K J Somaiya College ऍडमिशन रॅकेटचा पर्दाफाश; आणखी एका क्लर्कला अटक, अटकेची संख्या ४

181
K J Somaiya College ऍडमिशन रॅकेटचा पर्दाफाश; आणखी एका क्लर्कला अटक, अटकेची संख्या ४
K J Somaiya College ऍडमिशन रॅकेटचा पर्दाफाश; आणखी एका क्लर्कला अटक, अटकेची संख्या ४
विद्याविहार येथील के.जी.सोमय्या महाविद्यालयातील ऍडमिशन रॅकेट प्रकरणात गठीत करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने सोमय्या महाविद्यालयातील आणखी एका क्लर्कला अटक केली आहे. या प्रकरणात ही चौथी अटक असून यापूर्वी दोन क्लर्क आणि एका एजंटला अटक करण्यात आली होती, दरम्यान सोमय्या विश्वस्तांनी पैसे देऊन ऍडमिशन मिळविणाऱ्या ५० विद्यार्थ्यांचे ऍडमिशन रद्द केले आहे. ऍडमिशन रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाणार असल्यामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सोमय्या महाविद्यालय ऍडमिशन रॅकेटचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी पाच सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. (K J Somaiya College)
विद्याविहार येथील के. जी. सोमय्या ट्रस्टच्या केजी सोमय्या कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, के. जी. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स आणि एस.के सोमय्या विनय मंदिर ज्युनिअर कॉलेज या तीन महाविद्यालयात ऍडमिशन घोटाळा रॅकेट महाविद्यालयातील प्राचार्य यांनी उघडकीस आणल्यानंतर टिळक नगर पोलीस ठाण्यात महाविद्यालयातील दोन क्लर्कसह काही दलालावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन क्लर्क आणि एक दलाल यांना सोमवारी अटक केली होती, दरम्यान गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक (एसआयटी) गठीत करण्यात आली आहे. एसआयटीने शुक्रवारी आणखी एका क्लर्कला या घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे रॅकेट कमी टक्केवारी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना गाठून त्यांच्या मुलांना अकरावी मध्ये ऍडमिशन मिळवून देण्यासाठी २ ते ३ लाख रुपये घेत होते, त्यानंतर या विद्यार्थ्यांचे बोगस मार्कशीट आणि शाळेचा दाखला तयार करून मार्कशीट मध्ये टक्केवारी वाढवून सोमय्या कॉलेजात ऍडमिशन मिळवून देत होते.या टोळीने ५०, विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मोठ्या रकमा उकळून त्यांचे बोगस मार्कशीट तयार करून त्यांना ऍडमिशन दिल्याचे तसेच या रॅकेटमध्ये महाविद्यालयातील कर्मचारी यांचा सहभाग असल्याचे महाविद्यालयात प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. (K J Somaiya College)
 एसआयटीचे प्रमुख एसीपी
 मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेला दुजोरा देताना अतिरिक्त पोलिस आयुक्त महेश पाटील म्हणाले, “आरोपींनी यापूर्वी प्रवेशाचे रॅकेट चालवले असण्याची शक्यता आहे.  एसआयटी या पैलूवर देखील लक्ष देईल. (K J Somaiya College)
 “आम्ही लवकरच पालकांचे  जबाब नोंदवण्यास सुरुवात करू आणि तपासात काय निष्पन्न झाले यावर अवलंबून,पालकांवर कारवाई करण्याबाबत योग्य कायदेशीर सल्लामसलत केल्यानंतर पुढील कारवाई करू असे एका अधिकारी यांनी म्हटले आहे.या प्रकरणात क्लर्क  महेंद्र विष्णू पाटील (४९)  अर्जुन वसाराम राठोड (४३) दलाल देवेंद्र सायदे (५५) यांना  न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान शुक्रवारी या प्रकरणात आणखी एक क्लर्क पंडित रमेश कारणके (४२) यांना अटक करण्यात आली आहे. (K J Somaiya College)
शिक्षण मंडळाने घेतली दखल….
मुंबईचे शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे यांनी म्हटले आहे की, तक्रार मिळाल्यानंतर त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तीन महाविद्यालयांना भेट दिली.“महाविद्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे हे प्रवेश मिळवून दिले असल्याचे आढळून आले.  आमच्या प्राथमिक तपासणी नंतर लगेचच, तीनही कनिष्ठ महाविद्यालयाना ऍडमिशन रद्द करण्याच्या आणि तपास आणि कारवाईसाठी पोलिसांकडे औपचारिक तक्रार सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.दरम्यान नियमबाह्य अकरावी साठी ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन रद्द करण्यात आले आहे. (K J Somaiya College)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.