Central Railway: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेच्या ‘या’ मार्गावर असणार दोन दिवस विशेष पॉवर ब्लॉक

241
विविध पुलांच्या गर्डर लाँचिंगसाठी (Central Railway Girder Launching) शनिवारी आणि रविवारी मध्य रेल्वेवर ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक (Central Railway Power Block) घेण्यात येणार आहे. यामुळे काही मेल/ एक्स्प्रेसचे मार्ग बदलले जाणार असून काही उपनगरीय सेवा रद्द (local railway cancelled) करण्यात येणार आहेत. (Central Railway)

असा असेल ब्लॉक आणि गर्डर लाँचिंग कामे

– शनिवारी मध्यरात्री १:०० ते रविवारी पहाटे ४:३०

– ठाकुर्ली आणि कल्याण स्टेशन दरम्यान तिसरा पत्रीपूल रोड ओव्हर ब्रिज (आरओबी)

– उल्हासनगरमध्ये १२ मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिज

– कल्याण आणि अंबरनाथ दरम्यान लेव्हल क्रॉसिंग गेटऐवजी ओव्हर ब्रिज

-नेरळमध्ये ६ मीटर रुंद फ्लायओव्हर

– रविवारी मध्यरात्री २:०० ते सोमवारी पहाटे ५:३० पर्यंत

– ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकांदरम्यान तिसरा नवीन पत्रीपूल रोड ओव्हर ब्रिज

(हेही वाचा – रविवारी घराबाहेर पडण्याचा विचार करताय तर थांबा; कुठे, कधी, कसा असेल Megablock? जाणून घ्या)

विविध अभियांत्रिकी कामे

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी, सिग्नल आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मेगा ब्लॉक असणार आहे. सकाळी ९:३४ ते दुपारी ३:४०-  ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान – जलद लोकल डाऊन धिम्या मार्गावर वळविल्या जातील. कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकावर या लोकल थांबतील. तसेच  मेल-एक्स्प्रेस पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर वळविल्या जातील.

ट्रान्स हार्बरवर कसा फटका बसणार?

सकाळी १०.३५ ते दुपारी ४.१०- ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान – सर्व सेवा रद्द राहतील.

(हेही वाचा – Bus Accident: ताम्हिणी घाट बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर)

पश्चिम रेल्वे वाहतुकीत काय बदल?

शनिवारी (Western Railway) मध्य रात्री १२:३० ते रविवारी पहाटे ४ – भाईंदर आणि वसई रोड स्थानकादरम्यान- काही गाड्या रद्द होतील. धिम्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.