Lionel Messi : लायनेल मेस्सी मँचेस्टर युनायटेडकडून प्रिमिअर लीग खेळणार?

Lionel Messi : गॉर्डिओला यांनी मेस्सीला कर्जाऊ घेण्याच्या हालचाली सुरू केल्याचं समजतंय

39
Lionel Messi : लायनेल मेस्सी मँचेस्टर युनायटेडकडून प्रिमिअर लीग खेळणार?
Lionel Messi : लायनेल मेस्सी मँचेस्टर युनायटेडकडून प्रिमिअर लीग खेळणार?
  • ऋजुता लुकतुके

सध्या अमेरिकन फुटबॉल लीगमध्ये इंटर मियामी संघाकडून खेळत असलेला दिग्गज फुटबॉलपटू लायनेल मेस्सी या हंगामात मँचेस्टर युनायटेडकडून खेळताना कदाचित दिसू शकतो. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी मेस्सी इंग्लिश प्रिमिअम लीगमध्ये दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बातमी अशी आहे की, मँचेस्टर सिटीचे मुख्य प्रशिक्षक गोर्डिओला यांनी मेस्सीला इंटर मियामीकडून कर्जाऊ घेण्यासाठी बोलणी सुरू केली आहेत. अर्थात, या बातमीला कुठलाही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. (Lionel Messi)

(हेही वाचा- PM Narendra Modi यांच्यामुळे भाजपाचा विजय; ‘दी मॅट्रीझ’ संस्थेच्या सर्वेक्षणात माहिती)

मॅनसिटी संघाने सध्या त्यांच्या ११ सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. २ बरोबरीत सोडवले आहेत. आणि तब्बल ८ सामने गमावले आहेत. ईएफएल चषकाच्या उपउपान्त्य फेरीपर्यंत तर संघाने मजल मारली. पण, या सामन्यात टॉटनहॅम स्परकडून पराभव झाल्यानंतर संघाचं गाडं विजयाच्या रुळावरून घसरलं आहे. या पराभवानंतर बॉर्नमाऊथ संघाने त्यांना १-२ असं हरवलं. तर मागोमाग स्पोर्टिंग सीपी संघानेही १-४ असा फडशा पाडला. आधीच दुखापतीमुळे रॉड्री संघाबाहेर आहे. आणि त्यात आघाडीची फळी जमून येत नाहीए. (Lionel Messi)

सततच्या पराभवाने गांजलेल्या मॅनसिटीने अखेर लायनेल मेस्सीला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न चालवला आहे. डिसेंबरमध्ये फुटबॉल क्लबदरम्यान ‘ट्रान्सफर विंडो’ उघडते. यात दोन क्लब दरम्यान वाटाघाटी होऊन खेळाडूची इच्छा असेल तर ते क्लब बदलून काही काळासाठी दुसरीकडे खेळू शकतात. (Lionel Messi)

(हेही वाचा- ‘आरे’तील आणखी झाडे तोडण्याचा विचार आहे का? Supreme Court चा सरकारला सवाल)

मॅनसिटीचे प्रशिक्षक पेप गॉर्डिओला यांना रॉड्रीच्या अनुपस्थितीत आघाडीचं नेतृत्व करणारा खेळाडू हवा आहे. लीगचा दुसरा टप्पा सुरू होईपर्यंत सहा महिन्यांसाठी मेस्सीला करारबद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. विशेष म्हणजे इंटर मियामी लीगची सहमालकी डेव्हिड बेकहमकडे आहे. त्यामुळे त्याचा या कराराला विरोध असेल अशी शक्यता कमीच आहे. (Lionel Messi)

३७ वर्षीय लायनेल मेस्सी बार्सिलोना, पॅरिस सेंट जर्मेन आणि आता इंटर मियामी क्लबकडून फुटबॉल खेळला आहे. पण, आतापर्यंत तो एकदाही इंग्लिश प्रिमिअर लीग खेळलेला नाही. त्यामुळे हा करार पार पडला तर मेस्सीचं ईपीएलमध्ये पदार्पण होईल.  (Lionel Messi)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.