भारत जोडो यात्रेत अर्बन नक्षल कनेक्शन; विधानसभेत Devendra Fadnavis काय म्हणाले?

59

विधानसभेत भाषण देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) अर्बन नक्षलवादी संघटनांचा (Urban Naxalite organization) समावेश आहे, असा आरोप केला. भारत जोडो यात्रे दरम्यान, काठमांडू येथे माओवाद्यांची (Kathmandu Maoist Organization) बैठक झाली यामध्ये महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्याची चर्चा झाली होती. तसेच नोव्हेंबरमध्ये झालेल्या बैठकीत भारत, नेपाळ आणि बांग्लादेशतील सदस्य हजर होते. अशी माहिती एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिली. (Devendra Fadnavis)

मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या १२ ते १४ दरम्यान काठमांडूतील कांतीपूरमध्ये माओवाद्यांची उच्चस्तरीय बैठक (Kathmandu Maoist meeting) पार पडली. याबैठकीत आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या माओवाद्यांच्या टॉप कमांडर्सचा सहभाग होता. तसेच या बैठकीसाठी महाराष्ट्रातून किमान चार ते पाच जण बैठकीला हजर होते. महाराष्ट्रात महायुतीचा सरकारचा विजय झाल्यास काय करायचं यावर बैठकीत मंथन करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा विजय झालाच तर खापर ईव्हीएमवर (EVM) फोडण्याची रणनीती आखण्यात आली होती.

(हेही वाचा – Supreme Court ची महत्त्वाची टिप्पणी- पोटगीच्या नावावर संपत्तीचे समान वाटप चुकीचे, तर कायदा…)

माओवाद्यांच्या बैठकीत काय ठरले ?

विधानसभेत (Assembly Election 2024) महायुतीचा विजय झाल्यावर, येत्या काळात चार टप्प्यांत ईव्हीएमविरोधात महाराष्ट्रासह देशभरात आंदोलन सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. तसेच पहिल्या टप्प्यात प्रसारमाध्यमं, समाजमाध्यमातून ईव्हीएमविरोधात संशयाचं वातावरण निर्माण करणं. तर दुसऱ्या टप्प्यात ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यासाठी आंदोलन उभं करणं असं नियोजन करण्यात आले होते. विधानसभा निकालानंतर महायुती सरकारवर नाराज असलेल्या समाजघटकांना रस्त्यावर उतरवून सरकारविरोधी वातावरण तयार करणं, तसेच चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात अराजकतेची स्थिती निर्माण झाल्याचं सांगत सरकारविरोधात आरपारची लढाई पुकारणं या बाबींचं नियोजन करण्यात आलं होतं. यावरून आगामी काळात महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय वातावरणावर प्रभाव टाकण्याचा मोठा कट माओवाद्यांकडून रचला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.