- ऋजुता लुकतुके
२०१३ ते २०२१ या कालावधीत विराट कोहली (Virat Kohli) भारतीय संघाचा कर्णधार होता आणि या दरम्यान भारतीय संघाने भारतात आणि परदेशातही काही संस्मरणीय विजय मिळवले. कर्णधार म्हणून ६८ कसोटींपैकी ४० कसोटी त्याने जिंकल्या आणि ही विजयाची टक्केवारी भारतातील इतर कुठल्याही कर्णधारापेक्षा कितीतरी जास्त आहे. पण, तरीही विराटसाठी असे अनेक क्षण आले जेव्हा पराभव पचवणं त्याच्यासाठी कठीण गेलं. विराटची पत्नी अनुष्का शर्माचा मित्र वरुण धवनने याविषयी आपल्या ताज्या पोस्टमध्ये माहिती दिली आहे. ‘विराट प्रत्येक पराभवानंतर रडलेला मी पाहिलाय,’ असं अनुष्काने सांगितल्याचं वरुण म्हणतो.
२०१८ च्या इंग्लंड दौऱ्याची आठवण त्याने सांगितली आहे. या दौऱ्यात भारताला १-४ असा पराभव पत्करावा लागला. विराटने (Virat Kohli) स्वत: फलंदाजीत चांगली कामगिरी करताना २ शतकांसह ५९३ धावा केल्या होत्या. विराट तेव्हा आपल्या सर्वोच्च फॉर्ममध्ये होता. पण, संघाच्या पराभवामुळ तो व्यथित होता, असं वरुण धवन म्हणतो. ‘संघाचा पराभव विराट स्वत:वर घेत होता. आणि दु:खी होऊन कधी कधी स्वत:लाच मारुन घेत होता,’ असं वरुणने म्हटलं आहे.
(हेही वाचा – Rupee vs Dollar : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया का घसरतोय? त्याचे काय फायदे, तोटे आहेत?)
Guess he’s talking about the Edgbaston test 2018. Or maybe from 2021 Eng tour. pic.twitter.com/8SwzOH7PIT
— iᴍ_Aʀʏᴀɴ18 (@crickohli18) December 19, 2024
रणवीर शोमध्ये बोलताना वरुणने अनुष्काने सांगितलेल्या आठवणी सांगितल्या आहेत. अनुष्का वरुणला म्हणाली होती, ‘मी तेव्हा सामन्याला गेले नव्हते. एजबॅस्टनमध्ये भारतीय संघ हरला. मी हॉटेलवर परत आले तेव्हा विराट नक्की कुठे आहे मला ठाऊक नव्हतं. तर तो रुममध्ये विमनस्क अवस्थेत बसला होता, नव्हे झोपला होता आणि गादीवर मान खुपसून तो रडत होता. मी हरलो, असंच तो सारखं सारखं म्हणत होता.’
वरुण धवनचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पराभव तो मनावर घेतो. त्यामुळे आताच्या अपयशातूनही तो लवकर बाहेर पडेल, असं वरुणला वाटतं. विराट कोहली (Virat Kohli) २०२४ मध्ये अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहे. या वर्षांत १७ कसोटी डावांमध्ये मिळून त्याने फक्त ३७६ धावा केल्या आहेत आणि त्याची सरासरी आहे २५ धावांची. येत्या २६ तारखेला विराट या वर्षातील आपली शेवटची कसोटी मेलबर्न इथं खेळणार आहे. बोर्डर-गावस्कर मालिकेत सध्या १-१ अशी बरोबरी आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community