Russia Kazan Drone Attack: रशियाच्या कझानमध्ये 9/11 सारखा हल्ला; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

164

रशियातील कझान शहरात शनिवारी सकाळी अमेरिकेतील 9/11 सारखा हल्ला झाला. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनने कझानमध्ये 8 ड्रोन हल्ले (8 drone attacks in Kazan) केले, त्यापैकी 6 निवासी इमारतींवर झाले. हा हल्ला मॉस्कोपासून 800 किलोमीटर अंतरावर झाला. आतापर्यंत या हल्ल्यात कोणीही मारले गेल्याचे वृत्त नाही. (Russia Kazan Drone Attack)

रशियाच्या कझान (Kazan, Russia) शहरात 3 हायराइज इमारतींवर सीरियन किलर ड्रोन धडकले. त्यानंतर मोठी आग लागली. या हल्ल्यानंतर मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. रशियाने एक ड्रोनला टार्गेट करून नष्ट केल्याचं सांगितलं आहे.

कझानमधील उंच इमारतींवर ड्रोन हल्ल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वेगवेगळ्या दिशांनी येणारे किलर ड्रोन (यूएव्ही) हवेत इमारतींवर आदळत असल्याचे स्पष्टपणे दिसतंय. इमारतीला ड्रोन आदळल्यानंतर मोठा स्फोटही झाला. या हल्ल्याचा थेट आरोप रशियाने युक्रेनवर केला आहे. खबरदारी म्हणून जवळपासच्या उंच इमारतीही रिकामी करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी रशियातील कझान शहरातील विमानतळावरही उड्डाणे थांबवण्यात आली आहेत.

(हेही वाचा – Ashwin Retires : अश्विनला निवृत्तीनंतर कुणी कुणी फोन केले? ट्विट करून दिली माहिती)

2001 मध्ये अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर (World Trade Center in America) दहशतवाद्यांनी अशाच पद्धतीने 4 विमानांचे अपहरण केले होते. यापैकी 3 विमाने अमेरिकेतील 3 महत्त्वाच्या इमारतींवर एकामागून एक कोसळली. पहिला अपघात रात्री 8:45 वाजता झाला. बोईंग 767 हे विमान वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नॉर्थ टॉवरवर वेगाने आदळले. 18 मिनिटांनंतर, दुसरे बोईंग 767 इमारतीच्या दक्षिण टॉवरवर आदळले होते.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.