Virat Kohli : संजय बांगर यांनी विराट कोहलीला फलंदाजीसाठी काय सल्ला दिला?

Virat Kohli : यापूर्वी संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाचा विराटला फायदा झाला आहे

45
Virat Kohli : संजय बांगर यांनी विराट कोहलीला फलंदाजीसाठी काय सल्ला दिला?
Virat Kohli : संजय बांगर यांनी विराट कोहलीला फलंदाजीसाठी काय सल्ला दिला?
  • ऋजुता लुकतुके

भारताचे माजी फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी विराट कोहलीला त्याच्या फलंदाजीच्या दृष्टीकोणात थोडा बदल करण्याच्या आणि शरीरापासून जवळ चेंडू खेळण्याच्या सूचना केल्या आहेत. ‘क्रिकेट आणि फलंदाजीला शरण जा,’ असं त्यांचं विराटला सांगणं आहे. आगामी मेलबर्न कसोटीत विराटला फॉर्ममध्ये परतण्याची चांगली संधी आहे, असंही बांगर यांना वाटतं. या मालिकेत विराटने पर्थमध्ये १०० धावा करून चांगली सुरुवात केली. पण, त्यानंतर त्याच्या धावा आहेत ७, ११ आणि ३. पण, मेलबर्नची खेळपट्टी विराटच्या शैलीला साजेशी आहे. त्यामुळे तो इथे कमबॅक करेल अशीच आशा बांगर यांनी स्टार स्पोर्ट्सवर बोलताना व्यक्त केली आहे. (Virat Kohli)

(हेही वाचा- Russia Kazan Drone Attack: रशियाच्या कझानमध्ये 9/11 सारखा हल्ला; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल )

‘कधी कधी तुम्हाला क्रिकेटला शरण जायचं असतं. तुमची हुकुमत गाजवायची नसते. आधी खेळपट्टीवर थोडं स्थिरावण्याचा प्रयत्न करायचा. मग आपले फटके खेळायचे, हाच फलंदाजीचा एकमेव मार्ग आहे. विराटने तेच करावं. थोडा वेळ स्वत:ला आणि खेळपट्टीलाही द्यावा,’ असं बांगर यांचं म्हणणं आहे. मेलबर्नमध्ये यापूर्वी विराटने ६ कसोटींत ५२ धावांच्या सरासरीने ३१६ धावा केल्या आहेत. आताही तो या लौकिकाला जागेल असं बांगर यांना वाटतं. (Virat Kohli)

‘मेलबर्न क्रिकेट मैदान ऐतिहासिक आणि भव्य आहे. इथं फलंदाजीची मजाच वेगळी आहे. यापूर्वी १६९ धावांची खेळी विराट इथं खेळला आहे. तो जन्मजात लढवय्या आणि चॅम्पियन खेळाडू आहे. चॅम्पियन खेळाडूला मोठं व्यासपीठ आवडतं. तसंच हे आहे. इथे लोक खास विराटला बघायला येतात, हे त्याला माहीत आहे. या सगळ्याचा परिणाम विराटवर नक्की होईल,’ असं बांगर यांनी बोलून दाखवलं. (Virat Kohli)

(हेही वाचा- Punjab Attack: पंजाबमध्ये आणखी एका पोलिस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला; BKI ने घेतली जबाबदारी)

विराट कोहली क्रिकेटपटू म्हणून बहराला येत होता, तेव्हा संजय बांगर भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक होते. तेव्हा बांगर यांच्या सल्ल्यांचा फलंदाजीत उपयोग झाल्याचं विराट आवर्जून सांगतो. आजही त्यांचा आदराने उल्लेख करतो. दोघांमध्ये चांगले संबंध आहेत. त्यामुळे बांगर यांचा हा सल्लाही विराट ऐकेल अशी अपेक्षा करूया. (Virat Kohli)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.