Temple : १५० वर्षे जुने मंदिर पहारेकरी म्हणून आलेल्या वाजिद अलीने बळकावले, आधी मूर्ती चोरल्या… आता हिंदूंनी फडकवला भगवा ध्वज

106
Temple : १५० वर्षे जुने मंदिर पहारेकरी म्हणून आलेल्या वाजिद अलीने बळकावले, आधी मूर्ती चोरल्या... आता हिंदूंनी फडकवला भगवा ध्वज
Temple : १५० वर्षे जुने मंदिर पहारेकरी म्हणून आलेल्या वाजिद अलीने बळकावले, आधी मूर्ती चोरल्या... आता हिंदूंनी फडकवला भगवा ध्वज

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बरेली जिल्ह्यात धर्मांधांनी हडपलेले एक घर मंदिर असल्याचा दावा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे मंदिर (Temple) १५० वर्ष जुने आहे. ५० वर्षांपूर्वी इथे एक वाजिद अली नावाची व्यक्ती चौकीदाराचे काम करायची. मात्र हळूहळू त्याने संपूर्ण मंदिराची जमिन हडपली. त्यानंतर वाजिद अलीने मंदिरातील मूर्ती चोरल्या आणि पूजा अर्चना बंद करण्यास भाग पाडले. त्यानंतर मंदिरांला घर बनवून त्यावर इस्लामिक झेंडा लावण्यात आला. मात्र ज्यावेळी देशभरात मंदिरांवर होणाऱ्या अतिक्रमणाची माहिती लोकांपर्यंत पोहचत होती. तेव्हाच या घराच्या जागेवर असणाऱ्या मंदिराची माहिती मिळाली. लोकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने प्रकरणाचा तपास करून घर खाली करण्याची नोटीस घराच्या भिंतीवर लावली आहे. तसेच हिंदू (Hindu) संघटनेच्या सदस्यांनी सक्रीय होत घरावरील हिरवे झेंडे काढून त्याठिकाणी भगवे झेंडे लावले आहेत. (Temple)

( हेही वाचा : Russia Kazan Drone Attack: रशियाच्या कझानमध्ये 9/11 सारखा हल्ला; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बरेली येथील किला ठाण्याच्या हद्दीतील आहे. इथे राहणाऱ्या राकेश सिंह यांनी दावा केला की, आजपासून दीडशे वर्षांआधी आमच्या पूर्वजांनी येथे गंगा महाराणीचे एक मंदिर बनवले होते. त्यांनी मंदिरात विधीवत देवी-देवतांच्या मूर्तींची स्थापना केली. काही वेळानंतर हे मंदिर आजूबाजूच्या हिंदूंच्या (Hindu) आस्थेचे केंद्र बनले. इथे नियमित पूजा-अर्चना होऊ लागली.

राकेश सिंह (Rakesh Singh)  पुढे सांगितले की, जवळपास ५० वर्षांपूर्वी या मंदिरातील एका रुमला सहकारी समितीला भाड्याने दिले होते. सहकार समितीने वाजिद अली नावाच्या चौकीदाराला येथे देखभाल करण्यासाठी नियुक्त केले. आरोप आहे की, वाजिद अलीने पहिले सहकारी समितीची रुम आणि नंतर मंदिरावर कब्जा केला. त्याने हळूहळू मंदिरातील मूर्ती गायब करायला सुरुवात केली. पुढे पुजा-अर्चना ही बंद करण्यास त्याने भाग पाडले.

दरम्यान राकेश सिंह (Rakesh Singh) यांनी या मुद्यावर रान उठवल्यावर हिंदू संघटनेचे सदस्यही घराजवळ पोहचले. तिथे वाजिद अलीचा मुलगा सध्या वास्तव्यास आहे. हिंदू कार्यकर्त्यांनी घरावर लावलेले हिरवे इस्लामिक झेंडे हटवून तिथे भगवा ध्वज फडकवला. तसेच घराच्या छतावर उभे राहून जय श्रीरामची घोषणा दिली. हे प्रकरण दोन धर्मात धार्मिक तेढ निर्माण करणारे असल्याने पोलिस प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहेत. तसेच राकेश सिंह यांनी हे घर लवकर मंदिरासाठी हिंदूंना मिळावे, अशी विनंती प्रशासनाकडे केली आहे. (Hindu)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.