Bangladesh मध्ये वर्षभरात २२०० हिंदूवर अत्याचार; केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांची माहिती

57
Bangladesh मध्ये वर्षभरात २२०० हिंदूवर अत्याचार; केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांची माहिती
Bangladesh मध्ये वर्षभरात २२०० हिंदूवर अत्याचार; केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांची माहिती

बांगलादेशातील (Bangladesh) हिंदूंवर (Hindu) दिवसेंदिवस अत्याचार वाढत आहेत. भारत सरकारने याबाबत अनेकदा बांगलादेशकडे आक्षेप नोंदवले आहेत. असे असतानाही हिंसाचाराच्या घटनांमध्ये कोणतीही घट झालेली नाही. लोकसभेत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, यावर्षी दि. ८ डिसेंबरपर्यंत २२०० हिंदू (Hindu) आणि अल्पसंख्याकांवर अत्याचार झाले आहेत. तर पाकिस्तानमध्ये ११२ हिंदू (Hindu) हिसांचाराचे बळी ठरले आहेत. त्यामुळे बांगलादेशात पाकिस्तानपेक्षा कितीतरी पट जास्त हिंदू हिंसाचाराचे बळी ठरत आहेत.

( हेही वाचा : Jawaharlal Nehru यांच्या पत्रांत असे काय होते जे काँग्रेस लपवत आहे? पंतप्रधान संग्रहालयाचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला दिली महत्वाची माहिती

केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह (Kirti Vardhan Singh) यांनीही त्यांच्या उत्तरात सांगितले की, बांगलादेशमध्ये (Bangladesh) २०२२ मध्ये ४७ हिंदू आणि अल्पसंख्याक तर २०२३ मध्ये ३०२ लोक हिंसाचाराचे बळी ठरले आहेत. त्याच काळात पाकिस्तानमध्ये (Pakistan) अनुक्रमे २४१ आणि १०३ हिंदूवर हिंसाचार झाल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, बांगलादेश (Bangladesh) आणि पाकिस्तान (Pakistan) वगळता भारताच्या शेजारील कोणत्याही देशात हिंदू हिंसाचाराला बळी पडलेले नाहीत, असेही ते म्हणाले. (Kirti Vardhan Singh)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.