Conversion Case : विवाहितेचा ख्रिश्चन होण्यासाठी नवऱ्यावर दबाव; पीडित पतीने सुसाईड नोट लिहून केली आत्महत्या

82
Conversion Case : विवाहितेचा ख्रिश्चन होण्यासाठी नवऱ्यावर दबाव; पीडित पतीने सुसाईड नोट लिहून केली आत्महत्या
Conversion Case : विवाहितेचा ख्रिश्चन होण्यासाठी नवऱ्यावर दबाव; पीडित पतीने सुसाईड नोट लिहून केली आत्महत्या

छत्तीसगडच्या (Chhattisgarh) बालोदमध्ये पत्नीच्या धर्मांतराच्या दबावामुळे पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ३५ वर्षीय मृत व्यक्तीचे नाव सूरज देवांगन (Suraj Dewangan) उर्फ गजेंद्र आहे. गजेंद्र यांनी सुसाइड नोट लिहून पत्नीवर आणि सासरच्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हिंदू (Hindu) संघटना या प्रकरणानंतर अॅक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी धर्मांतराच्या आरोपाचे फेटाळून लावले आहेत. ही घटना दि. २० डिसेंबर रोजी घडली. (Conversion Case)

(हेही वाचा : Dadar Hawker : दादरमध्ये डिसिल्व्हा आणि जावळे मार्ग आहेत का? महापालिका आणि पोलिसांनाच पडला विसर

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बालोद जिल्ह्याच्या पोलिस ठाण्याच्या अजुर्नंदा येथील आहे. दि. २० डिसेंबर रोजी वार्ड नंबर ११ मध्ये राहणाऱ्या सूरज देवांगन (Suraj Dewangan) नावाच्या तरुणाने फाशी लावून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी सूरजने (Suraj Dewangan) घराच्या भिंतीवर सुसाईड नोट लिहली. या नोटमध्ये सूरजने लिहले, माझी पत्नी राकेश्वरी देवांगन जी माझ्याशी नेहमी वाद घालायची. लहान मुलांना सोडून ती वारंवार सासरी जात असे आणि तिने ईसाई धर्म स्विकारला. (Conversion Case)

याच सुसाईड नोटमध्ये सूरजने प्रकाश देवांगन यांनी पत्नीने माझ्याकडून ५० हजार रुपये घेतले आणि ते परत न केल्याचेही नमूद केले आहे, पत्नीशिवाय सासरच्या मंडळींकडून वर्षानुवर्षे होत असलेल्या छळाचाही उल्लेख त्यांनी नोटमध्ये केला. या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने (Vishwa Hindu Parishad) केली आहे. कारवाईत हलगर्जीपणा दाखवल्यास मोठे आंदोलन करण्यात येईल, असे विहिंपचे पदाधिकारी बलराम गुप्ता यांनी सांगितले. मृताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. (Conversion Case)

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र, पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोलीस या प्रकरणात धर्मांतराचा दावा फेटाळत आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, यापूर्वी सूरजची पत्नी राजेश्वरीने पतीविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली होती. आत्महत्येमागे प्रशासन पैसे आणि घरगुती वाद हे कारण मानत आहे. सध्या सर्वच ठिकाणी तपास सुरू आहे. सूरजने (Suraj Dewangan) दोन महिन्यांपूर्वी पोलिसांत तक्रार दाखल करून पत्नीवर मुलांना सोडून माहेरी जाण्याचे आरोप केले होते. सुरजची पत्नी ख्रिश्चन धर्माचे पालन करते, यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते, असेही पोलिसांनी कबूल केले आहे. (Conversion Case)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.