Cyber Crime : उत्तर प्रदेशातील सायबर माफियांना दिली ८० बँक खाते उघडून; विरारच्या दोघांना अटक

59
Cyber Crime : उत्तर प्रदेशातील सायबर माफियांना दिली ८० बँक खाते उघडून; विरारच्या दोघांना अटक
  • प्रतिनिधी

ऑनलाईन फसवणूक (Cyber Crime) करणाऱ्या सायबर माफियांकडून प्रत्येक राज्यातील मुख्य शहरातील गरजू आणि गरीब लोकांना लक्ष केले जात आहे. या लोकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे बँक खाते उघडून या खात्यावर फसवणुकीची रक्कम मागवली जात आहे. गरीब आणि गरजूंना लक्ष करण्यासाठी सायबर माफियांनी शहरातील काही तरुणांना हाताशी धरले असून या तरुणांकडून विविध बँकांमध्ये लोकांचे खाते उघडून या खात्याचे चेक बुक, डेबिट कार्ड उत्तर प्रदेशात बसलेल्या सायबर माफियांच्या दलालांना पाठवले जात असल्याचा धक्कादायक खुलासा कफ परेड पोलिसांच्या कारवाईतून समोर आला आहे.

(हेही वाचा – Dadar Hawker : दादरमध्ये डिसिल्व्हा आणि जावळे मार्ग आहेत का? महापालिका आणि पोलिसांनाच पडला विसर)

कफ परेड पोलिसांनी भारतीय सैन्य दलातील व्यक्तीच्या झालेल्या ऑनलाइन फसवणुकीप्रकरणी (Cyber Crime) विरार येथून दोन तरुणांना अटक केली आहे. या दोघांनी वसई-विरार येथे ८० बँक खाते उघडून चेक बुक, डेबिट कार्ड सायबर माफियांना पाठविल्याचे तपासात समोर आले आहे. मोबदल्यात या दोघांना बँक खाते उघडून देण्यासाठी प्रत्येकी खात्यामागे १ हजार ते आठशे रुपयांचे कमिशन मिळाल्याची कबुली या दोघांनी पोलिसांना दिली आहे. अमित अनंत पांचागणे (३२) आणि निखिल अनंत कुळे (२७) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे पालघर जिल्ह्यातील विरार येथील आचोळे गाव येथे राहणारे आहेत. या गुन्ह्यातील तक्रारदार भारतीय सैन्य दलात नोकरीला आहे. तक्रारदाराला बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता भरायचा असल्यामुळे ते बँकेत गेले असता, बँकेने त्यांना कर्जाचा हप्ता होम ब्रँच मधून भरा असे सांगण्यात आले होते. तक्रारदाराने गुगलवर उत्तर प्रदेशातील बँक शाखेचा संपर्क क्रमांक शोधला असता त्यांना एक मोबाईल क्रमांक आढळून आला. त्यांनी त्या क्रमांकावर संपर्क करून कर्जाचा हप्ता संदर्भात चर्चा केली. थोड्या वेळात त्यांना बँक मॅनेजर कॉल करतील असे सांगण्यात आले. काही वेळाने तक्रारदाराला व्हॉट्सॲप कॉल करण्यात आला. बँक मॅनेजर अजय बोलत असल्याचे कॉल करणाऱ्याने सांगितले. तक्रारदाराने कर्जाचा हप्ता भरण्यासंदर्भात चर्चा केली असता त्यांना कॉल करणाऱ्याने तक्रारदाराला Customer Support या नावाची APK फाईल त्यांच्या WhatsApp क्रमांकावर पाठवली. त्यानुसार तक्रारदाराने सदर फाईल त्यांच्या मोबाईलमध्ये ओपन करून त्यावर त्यांच्या बॅक खात्याची संपूर्ण माहिती भरली असता समोरील व्यक्तीने तक्रारदाराच्या मोबाईलचा Access घेऊन phone pay द्वारे तक्रारदाराची 97,614/- रुपयांची आर्थिक फसवणूक केली. (Cyber Crime)

(हेही वाचा – दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी BJP उमेदवारांची छाननी सुरु)

याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत आदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. अमित देवकर, पो. उ. नि. रूपेशकुमार भागवत, स.पो.उप.नि. म्हात्रे, राठोड, ताटे, गुंजाळ, पो.ह. सचिन पाटील या पथकाने तांत्रिक तपास करून ज्या बँक खात्यावर पैसे गेले त्या खात्याची माहिती काढली असता, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बॅंकेच्या खात्यावर अमित पांचागणे याच्या खात्यावर पैसे गेल्याचे तपासात समोर आले. पोलीस पथकाने अमित पांचागणे याची माहिती मिळवून त्याला विरार येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडे बॅंक खात्याबाबत चौकशी केली असता बँक खाते त्याचा मित्र निखिल कुळे याने उघडले असल्याचे सांगून या खात्याशी संबंधित डेबिट कार्ड तसेच चेक बुक हे निखिल याच्यामार्फत उत्तर प्रदेश मधील अरविंद चौरसिया यास दिले असल्याचे व तोच नमूद बॅंक खाते हाताळत असल्याचे सांगितले. तपास पथकाने निखिल कुळे याला विरार येथील अलकापूरी येथून अटक करण्यात आली. निखिलची चौकशी केली असता त्याने विरार मधील अनेक लोकांचे विविध बँकेमध्ये ८० बँक खाते उघडून त्या खात्याचे डेबिट कार्ड व चेक बुक उत्तर प्रदेशचा रहिवाशी असलेला अरविंद चौरसिया यास पुरविले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (Cyber Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.