- विशेष प्रतिनिधी, मुंबई
माझगाव ताडवाडी बीआटी चाळीच्या पुनर्विकासाबाबत यापूर्वी नेमलेल्या विकासकाचा करार संपुष्टात आणून त्याजागी महापालिकेच्यावतीने नवीन विकासकाची नेमणूक केली असली तरी संबंधित विकासकाची नेमणूक करताना भाडेकरुंना विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे या पुनर्विकास प्रकल्पाबाबत नेमलेल्या विकासकाच्या नेमणुकीबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांच्या दालनात महापालिका आयुक्त, संबंधित अधिकारी, विकासक, रहिवाशांचे प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन रहिवाशांना या प्रकल्पाची माहिती तसेच विश्वास दिला जावा अशी मागणी विधीमंडळामध्ये स्थानिक आमदार मनोज जामसुतकर यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलतांना केली. (Mazgaon Tadwadi Redevelopment Project)
(हेही वाचा – Ashwin Retires : हरभजन-अश्विन भांडणावर अखेर हरभजनने सोडलं मौन)
भायखळा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार मनोज जामसुतकर यांनी विधीमंडळातील माझगाव ताडवाडीतील रखडलेल्या पुनर्विकासाबाबत सरकारचे लक्ष वेधले. जामसुतकर यांनी माझगाव येथील ताडवाडी बीआयटी चाळीच्या पुनर्विकासाचा मुद्दा उपस्थित करत येथील बीआयटी चाळ क्रमांक १४, १५, आणि १६ या इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन माहुलमधील प्रकल्प बाधितांच्या सदनिकांमध्ये केले आहे. अनेक वर्षांपासून हे रहिवाशी तिथे राहत असून माहुलचा परिसरत प्रदुषित असल्याने येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे यासर्व रहिवाशांचे तातडीने स्थलांतर माझगाव परिसरात केले जावे अशी मागणी करताना जामसुतकर यांनी महापालिकेच्या मार्फत या इमारतींच्या पुनर्विकासाला मंजुरी दिलेली आहे. या पुनर्विकास प्रकल्पासाठी महापालिकेने जो काही विकासक नेमला आहे, त्यामध्ये स्थानिकांना विश्वासात घेतलेले नाही. तसेच जो विकासक नेमलेला आहे तो विकासक नसून केवळ लायझनिंग करणारा आहे. त्यामुळे या विकासक नेमणुकीबाबत रहिवाशांच्या मनात जी काही शंका आहे, ती दूर करण्यासाठी तसेच या प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात महापालिका आयुक्त, संबंधित खात्याचे अधिकारी, विकासक, भाडेकरुंचे प्रतिनिधी तसेच लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करून बैठक घ्यावी आणि हा प्रकल्प तातडीने विनाविलंब राबवण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी जामसुतकर यांनी केली. (Mazgaon Tadwadi Redevelopment Project)
(हेही वाचा – Mobile Theft: मध्य रेल्वेच्या ‘या’ मार्गावर तीन वर्षांत इतक्या हजार स्मार्टफोनवर डल्ला; धक्कादायक आकडेवारी आली समोर)
माझगाव परिसरात न्यायालयीन इमारती असून माझगाव कोर्ट आणि निवासी इमारती आहेत. गुलमोहर आणि पारिजात अशा दोन इमारती आहेत. यातील गुलमोहर इमारत यापूर्वीच धोकादायक बनल्याने ती यापूर्वीच पाडलेली आहे, त्याचे अद्याप बांधकाम सुरु झालेले नाही. आता पारिजात इमारतही धोकादायक बनली आहे. त्यामुळे या न्यायालयीन इमारतींचा तातडीने पुनर्विकास केला जावा अशीही मागणी केली. (Mazgaon Tadwadi Redevelopment Project)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community