- ऋजुता लुकतुके
शेअर बाजारात सकारात्मक बातम्यांमुळे ज्या शेअरची किंमत वाढते, त्या शेअरना ‘खबरोवाले शेअर’ असं म्हणतात. कारण, बातमीच्या आधारावर शेअर तरून जातो आणि गुंतवणूकदारांमध्ये आशा निर्माण होते, शेअर आणखी वर जाण्याची. अशाच काही सकारात्मक घटना गेल्या आठवड्यात ग्रीव्हज कॉटन शेअरच्या बाबतीत घडल्या आहेत. त्यामुळे एकाच आठवड्यात शेअर तब्बल ३० टक्के वर गेला आहे. (Greaves Cotton Share Price)
विजय केडिया हे शेअर बाजारातील एक मोठं नाव. १८ व्या वर्षी गुंतवणूक सुरू करून त्यांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीवर साम्राज्य उभं केलं आहे. अशा या जाणकार गुंतवणूकदाराने ग्रीव्हज कॉटन कंपनीचे १२ लाख रुपयांचे शेअर एकाच दिवशी खरेदी केली आणि तिथून या शेअरने बाजारात गती पकडली. शुक्रवारी एकूणच शेअर बाजाराची मोठी पडझड झाली. त्यामुळे अडीच टक्क्यांच्या घसऱणीसह ग्रीव्हज कॉटनही २३८ रुपयांवर बंद झाला. (Greaves Cotton Share Price)
(हेही वाचा – Virat Kohli : संजय बांगर यांनी विराट कोहलीला फलंदाजीसाठी काय सल्ला दिला?)
पण, एरवी गेल्या आठवड्यातच हा शेअर ५२ आठवड्यातील उच्चांक प्रस्थापित करून आला आहे. एकाच दिवसात १५ टक्क्यांनी उसळून तो २५९ रुपयांपर्यंत पोहोचला होता. केडिया यांची गुंतवणूक हे एक कारण. आणखीही काही ठोस कारणं यामागे होती. (Greaves Cotton Share Price)
कंपनीच्या संचालक मंडळाने नवीन ऑफर फॉर सेल प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कंपनीतील प्रमोटरचे शेअर या योजनेत विक्रीसाठी येणार आहेत. त्यामुळे या शेअरविषयी उत्साहाचं वातावरण आहे. कंपनीत बाहेरून गुंतवणूक वाढणार आहे आणि एकप्रकारे हा कंपनीचा महसूलच असेल. (Greaves Cotton Share Price)
(हेही वाचा – Cyber Crime : उत्तर प्रदेशातील सायबर माफियांना दिली ८० बँक खाते उघडून; विरारच्या दोघांना अटक)
ग्रीव्हज कॉटनची एक उपकंपनी ग्रीव्ह्ज रिटेलने ऊर्जा क्षेत्रातील एक नवीन उपकरण बाजारात आणलं आहे आणि या उत्पादनाकडून कंपनीला खूप अपेक्षा आहेत. लोकांकडूनही त्याला मागणी आहे. या बातमीमुळेही गुंतवणूकदारांमध्ये या शेअरची चर्चा आहे. (Greaves Cotton Share Price)
तिसरं म्हणजे एकाच आठवड्यात मोठी उसळी मारलेल्या या शेअरबद्दल बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेअर बाजारांनी सतर्कता बाळगण्याच्या दृष्टीने काही आर्थिक माहिती मागितली आहे. शेअरमध्ये उसळी का आली हे जाणून घेऊन गुंतवणूकदारांना पारदर्शक माहिती पुरवण्याचा हा प्रयत्न आहे. ही माहिती कंपनीने दिली तर त्यांच्याबद्दल सकारात्मक संदेश गुंतवणूकदारांमध्ये जाऊ शकतो आणि त्यातून अलीकडे आलेली उसळी ही गैरमार्गाने आणलेली नव्हती, हे सिद्ध झालं तर शेअरमध्ये तेजीची नवीन लाटही येऊ शकते. (Greaves Cotton Share Price)
(टिप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी त्यांच्या जोखमीवर शेअर बाजारात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरमध्ये खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community