- ऋजुता लुकतुके
शेअर बाजार हा मूळातच चढ उताराचा खेळ आहे. पण, गुंतवणूकदारांना हे चढ उतार नेमके का होतात याचं भान ठेवावंच लागतं. तरंच या गुंतवणुकीतून पैसे कमावता येतात. सीडीएसएल या शेअरमध्ये गेल्या महिनाभरात अशाच घडामोडी घडताना दिसल्या. त्या मागचा अर्थ समजून घेऊया. गेल्याच महिन्यात कंपनीने गुंतवणूकदारांना बोनस शेअर देऊ केले. तेव्हापासून अर्थातच शेअर तेजीत होता. आणि तो १,९५९ या ५२ आठवड्यातील उच्चाकांला स्पर्श करून आला. (Cdsl Share Price)
आणि तेव्हापासून तो चढ्या भावातच ट्रेड होत होता. त्यामुळे सतत वर गेलेल्या या शेअरमध्ये थोडी नफारुपी विक्री येण्याचा अंदाज होताच. पण, या आठवड्यात अशा विक्रीबरोबरच एका काळजी करण्यासारख्या बातमीची भर पडली आणि शेअरने उच्चांकापासून जवळ जवळ १०० अंशांची घसरण पाहिली आहे. (Cdsl Share Price)
(हेही वाचा – Bangladesh मध्ये वर्षभरात २२०० हिंदूवर अत्याचार; केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांची माहिती)
सीडीएसएल म्हणजे सेंट्रल डीपॉझिटरी सर्व्हिसेस. आपण विकत घेतलेले डिजिटल स्वरुपातील शेअर साठवण्याचं काम ही कंपनी करते. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड तसंच इतर सेक्युरीटींच्या एकूण व्यवहारात हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या बाबतीत कंपनीची मक्तेदारीही आहे. त्यामुळे एका खराब बातमीने कायमचा कोसळेल असा हा शेअर नाही. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी या बातमीचा नकारात्मक विचार करण्याची गरज नाही. पण, बातमी अशी आहे की, सीडीएसएलकडे असलेले तुमचे शेअर विकताना दलालांना तांत्रिक अडचण येत होती. तशी बातमीच झिरोदाने ट्विट करून दिली होती. या तांत्रिक अडचणीमुळे शेअर विक्री सुरळीत होत नव्हती. (Cdsl Share Price)
(हेही वाचा – Greaves Cotton Share Price : ग्रीव्हज कॉटन शेअरमध्ये एका आठवड्यात ३० टक्यांची वाढ; शेअरमध्ये वाढीची ३ कारणं)
या बातमीचा परिणाम शेअरच्या किमतीवर दिसून आला आणि शुक्रवारी एकाच दिवसांत शेअर ५ टक्क्यांनी खाली आला. पण, कंपनीची तिमाही कामगिरी चोख आहे आणि कंपनीने ४९ टक्के महसूल वाढीची नोंदही केली आहे आणि कंपनीच्या विक्रीतही ५५ टक्क्यांची वाढ झाली आहे. (Cdsl Share Price)
(टिप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी त्यांच्या जोखमीवर शेअर बाजारात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरमध्ये खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community