Ramayana, Mahabharata अरबी भाषेत प्रकाशित; कुवेतमध्ये पंतप्रधान मोदी यांची पुस्तकाच्या प्रकाशकाने घेतली भेट

54
Ramayana, Mahabharata अरबी भाषेत प्रकाशित; कुवेतमध्ये पंतप्रधान मोदी यांची पुस्तकाच्या प्रकाशकाने घेतली भेट
Ramayana, Mahabharata अरबी भाषेत प्रकाशित; कुवेतमध्ये पंतप्रधान मोदी यांची पुस्तकाच्या प्रकाशकाने घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. २१ डिसेंबरपासून दोन दिवसांच्या कुवैत दौऱ्यावर आहेत. गेल्या ४३ वर्षांतील भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच कुवैत दौरा आहे. दि. २१ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) कुवैत शहरात प्रवेश करताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांनी (Narendra Modi) अरबी भाषेत प्रकाशित झालेल्या रामायण, महाभारत (Ramayana, Mahabharata) या महाकाव्याच्या पुस्तकावर स्वाक्षरी केली. या पुस्तकाचे प्रकाशक अब्दुल्लातिफ अलनेसेफ (Abdullatif Alansef) असून भाषांतरकार अब्दुल्ला बरोन (Abdullah Baron) आहेत. त्यांनी २१ डिसेंबरला पंतप्रधान मोदींची (Narendra Modi) भेट घेतली.

( हेही वाचा : Bangladesh मध्ये वर्षभरात २२०० हिंदूवर अत्याचार; केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांची माहिती

यावेळी अब्दुल्लातिफ म्हणाले की, मी आज खूप आनंदी आहे. हा माझ्यासाठी सन्मान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यामुळे खूप आनंदी आहेत. हे दोन्ही पुस्तके महत्त्वाची आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची दोन्ही पुस्तकांवर स्वाक्षरी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दि. २१ डिसेंबर रोजी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर पोहोचले. ४३ वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच कुवेत भेट आहे. पंतप्रधान मोदींच्या आधी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९८१ मध्ये कुवेतला गेल्या होत्या. विमानतळावर मोदींचे रेड कार्पेटवर स्वागत करण्यात आले. भारतीय वंशाच्या लोकांनी पंतप्रधान मोदींसाठी कथकली नृत्य सादर केले. यानंतर पंतप्रधान अमीर शेख मेशल अल अहमद (Emir Sheikh Meshal Al Ahmed) यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, हायड्रोकार्बन, संरक्षण संबंधांवर चर्चा होणार आहे. (Narendra Modi)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.