BMC : विक्रोळी पोलिस ठाण्याला महापालिकेने दिला हात, अखेर पोलिस ठाण्यासाठी पर्यायी जागा मिळाली

253
BMC : विक्रोळी पोलिस ठाण्याला महापालिकेने दिला हात, अखेर पोलिस ठाण्यासाठी पर्यायी जागा मिळाली
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

विक्रोळी पार्क साईट पोलिस ठाणेच्या खालील भागातून गटाराचे पाणी वाहत असल्याने पावसाळ्यात या गटाराचे पाणी पोलिस ठाण्याच्या आवारात वाहत जाते. त्यामुळे आता याठिकाणी नव्याने पोलिस ठाणे बांधण्यात येणार असून यासाठी महापालिकेने पोलिसांना हात दिला आहे. या पोलिस ठाण्यासाठी घाटकोपर गावातील कल्पतरु कॉम्पलेक्सजवळील एक मजली बांधीव इमारत भाडेतत्वावर दिली जाणार आहे. (BMC)

(हेही वाचा – Traffic Police : दंडाची थकीत रक्कम न भरल्यास वाहने जप्त होणार; वाहतूक पोलिसांची नवीन कार्यप्रणाली)

विक्रोळी पार्क साईट पोलिस ठाण्याकरता महापालिकेच्यावतीने जागा उपलब्ध व्हावी यासाठी एप्रिल २०२३ पासून पाठपुरावा सुरु असून यावर अखेर महापालिका प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलत जागा उपलब्ध करून दिली आहे. घाटकोपर पश्चिम येथील कल्पतरु कॉम्पलेक्स जवळील महापालिकेच्या मालकीचा महापालिका चौकीकरता आरक्षित आहे. तळ अधिक एक मजला या अशाप्रकारे वाढीव बांधकाम असलेली वास्तू महापालिकेच्या एन विभागाला हस्तांतरीत झाला आहे. महापालिकेच्या एन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहिती नुसार या इमारतीतमधील तळमजला अधिक वरचा एक मजला रिक्त आहे. त्यामुळे विक्रोळी पार्क साईट पोलिस ठाण्याला ८१८.६१ चौरस मीटरच्या क्षेत्रफळाची जागा पाच वर्षांकरता भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. प्रति माह एक लाख रुपये भाडे आकारले जाणार आहे. या वास्तूचे एकूण क्षेत्रफळ हे १३३५.२२ चौरस मीटर असून त्यातील ८१८ चौरस मीटरची जागा पोलिस स्थानकाला भाडेतत्वावर देवून उर्वरीत ५१६ चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा महापालिकेच्या ताब्यात राहणार आहे. (BMC)

(हेही वाचा – Yerawada Jail : कारागृहातील कैद्यांच्या हालचालींवर बायोमेट्रिक, पॅनीक अलार्मसह आधुनिक प्रणालींचा वापर)

विक्रोळी पार्कसाईटच्या जागेच्या खालून गटाराचे पाणी वाहत असून पावसाळ्यामध्ये सर्व गटाराचे पाणी पोलिस ठाण्याच्या आवाराज वाहत असते. त्यामुळे रोगराई हाऊन पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. हा परिसर दाटीवाटीचा असल्याने या जागेत पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली वाहने व साहित्य रस्त्यावर ठेवल्यास वाहतुकीची समस्या निर्माण होते. त्यामुळे पोलिस ठाणे नव्याने बांधण्याच्या हालचाली सुरु झाली असून आसपास जागेचा शोध सुरु करण्यात आला होता, त्यानुसार महापालिकेकडे बांधीव इमारत असल्याने ही जागा भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.