Vicky Jain Net Worth : मुंबईत ८ खोल्यांचा फ्लॅट, आलिशान गाड्यांचा ताफा, विकी कौशलची मालमत्ता एकूण किती आहे?

Vicky Jain Net Worth : विकी जैन १३० कोटी रुपयांचा मालक असल्याचं समजतंय.

64
Vicky Jain Net Worth : मुंबईत ८ खोल्यांचा फ्लॅट, आलिशान गाड्यांचा ताफा, विकी कौशलची मालमत्ता एकूण किती आहे?
  • ऋजुता लुकतुके

यावर्षी बिगबॉस १८ मध्ये झळकल्यानंतर विकी कौशल पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. ‘लाफ्टर शेफ्स’मुळे तो लोकांच्या ओळखीचा होताच. आता शाहरुख खानने लोकप्रिय केलेल्या जुन्या फौजी मालिकेच्या दुसऱ्या भागातही तो झळकणार आहे. त्यामुळे एकीकडे कामाच्या बाबतीत त्याचे दोन्ही हात भरलेले आहेत. दुसरीकडे त्यामुळे त्याच्या मालमत्तेही भर पडते आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती असलेल्या विकी जैनकडे या घडीला १३० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचं अधिकृत आकडेवारीतून सामजतं आहे. (Vicky Jain Net Worth)

(हेही वाचा – Temple : १५० वर्षे जुने मंदिर पहारेकरी म्हणून आलेल्या वाजिद अलीने बळकावले, आधी मूर्ती चोरल्या… आता हिंदूंनी फडकवला भगवा ध्वज)

मुंबईत जैनचा ८ बेडरुमचा एक मोठा फ्लॅट आहे. तसंच त्याचं मूळ गाव असलेल्या बिलासपूरमध्ये त्याने एक आलिशान बंगला बांधला आहे. अलीकडेच पत्नी अंकिता लोखंडेनं तिथे शूटिंग करून घराचं भव्य इंटिरिअर दाखवलं होतं. विकी जैन उद्योजक कुटुंबातून येतो आणि त्यांच्या कौटुंबिक कोळसा उत्पादन व्यवसायातूनही विकी जैनला १०० कोटी रुपयांचं उत्पन्न मिळतं. विकी जैनची वैयक्तिक मालमत्ताही १३० कोटी रुपयांची आहे. सध्या विकी जैन लाफ्टर चॅलेंजमध्ये दिसत आहे. (Vicky Jain Net Worth)

(हेही वाचा – Traffic Police : दंडाची थकीत रक्कम न भरल्यास वाहने जप्त होणार; वाहतूक पोलिसांची नवीन कार्यप्रणाली)

विकी जैन आणि अंकिता लोखंडे या जोडप्याची मुंबईत दोन आलिशान घरं आहेत. तसंच दोघांना लक्झरी गाड्यांचीही आवड आहे. विरी जैन नियमितपणे आपल्या लँडक्रूझर आणि मर्सिडिझ गाड्यांमध्ये दिसतो. तर अंकिता लोखंडेची जॅग्वार एक्सएफ आणि पोर्श ७१८ ही लोकांचं लक्ष वेधून घेत असते. (Vicky Jain Net Worth)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.