- ऋजुता लुकतुके
टेक क्षेत्रात मिळणारा पगार, रोजगाराच्या संधी आणि त्यातून परदेशात जाण्याची संधी अशा अनेक कारणांसाठी सध्या संगणक शास्त्राशी निगडित अभ्यासक्रमांना मोठी मागणी आहे. शिवाय हे क्षेत्र सतत विकसित होणारं आहे. त्यामुळे इथं शिकणं आणि शिकवण्याच्याही संधी पुरेपूर उपलब्ध आहेत. अशावेळी बॅचलर इन कम्प्युटर ॲप्लीकेशन अर्थात संगणक शास्त्रातील पदवी अभ्यासक्रमाविषयी माहिती घेऊया. (Bca Course Fees)
महाराष्ट्रात या घडीने ४५० महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम शिकवला जातो आणि यातील १८८ महाविद्यालयं खाजगी क्षेत्रातील, १४३ अनुदानित तर १२ सरकारी विद्यापीठातील विभाग आहेत. १२ वी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विज्ञान मुख्य विषय असलेल्या किंवा कला, वाणिज्य शाखेत संगणकाशी संबंधित विषय असेल तर तुम्ही संगणक शास्त्र हा विषय पदवी परीक्षेसाठी निवडू शकता. प्रवेशासाठी तुम्हाला सामायिक प्रवेश परीक्षा मात्र द्यावी लागते आणि त्यानंतर तुमचा प्रवेश निश्चित होतो. (Bca Course Fees)
(हेही वाचा – भारत जोडो यात्रेचे नक्षलवाद्यांशी कनेक्शन; काँग्रेस आणि समविचारी पक्षांच्या अंगलट येणार; Pravin Dixit यांचा इशारा)
या अभ्यासक्रमाचं वार्षिक शुल्क हे १ लाख रुपये ते ५ लाख रुपये या दरम्यान आहे. तुम्ही कुठे प्रवेश घेता त्यावर हे शुल्क अवलंबून आहे. २६ संस्थांमध्ये हे शुल्क १ लाख रुपयांपेक्षा कमी आहे. तर ४ संस्थांमध्ये ते ५ लाख रुपयांपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे प्रवेश घेण्यापूर्वी या गोष्टीची माहिती करून घेणं आवश्यक आहे. (Bca Course Fees)
पदवी मिळवताना तुम्ही संगणक शास्त्र, डिजिटल विपणन, कृत्रिम बुद्धिमत्ता व मशिन लर्निंग, मोबाईल ॲप विकास, युएक्स/युआय असे विषय शिकू शकता. भारती विद्यापीठाकडून घेतली जाणारी बीयुएमएटी, राज्य सरकारकडून घेतली जाणारी एमचसीआयटी या लोकप्रिय सामायिक परीक्षा आहेत, ज्यात चांगले गुण मिळवून तुम्ही या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता. बारावीचं शिक्षण इंग्लिशमधून झालेलं असणं त्यासाठी बंधनकारक आहे. (Bca Course Fees)
देशातील आघाडीच्या खाजगी संस्था आणि त्याचं शुल्क पाहूया,
(हेही वाचा – BMC : विक्रोळी पोलिस ठाण्याला महापालिकेने दिला हात, अखेर पोलिस ठाण्यासाठी पर्यायी जागा मिळाली)
राज्यातील जवळ जवळ सर्व विद्यापीठांशी संलग्न अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. सरकारी संस्थांमध्ये नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स, डीएमआयएचईआर आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय इथले बीएसएचे अभ्यासक्रम प्रसिद्ध आहेत. बीएसए अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संस्थांमध्ये कॅम्पस भरतीचीही सोय असते. (Bca Course Fees)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community