बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करणार; Devendra Fadnavis यांची रोखठोक भूमिका

54
बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करणार; Devendra Fadnavis यांची रोखठोक भूमिका
बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करणार; Devendra Fadnavis यांची रोखठोक भूमिका

मुंबईत बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना (Bangladeshi infiltrators) शोधण्याचे काम सुरु आहेत. बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार (डी-पोर्ट) करणार असल्याची सरकारची भूमिका असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दि. २१ डिसेंबर रोजी दिली. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ), यांच्यासह अन्य मंत्रीही उपस्थित होते. (Bangladeshi infiltrators)

( हेही वाचा : भारत जोडो यात्रेचे नक्षलवाद्यांशी कनेक्शन; काँग्रेस आणि समविचारी पक्षांच्या अंगलट येणार; Pravin Dixit यांचा इशारा

राहुल गांधींच्या यात्रेत शहरी नक्षलवादी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ‘‘राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काढलेल्या भारत जोडो अभियान यात्रेमध्ये सहभागी असलेल्या १८० संघटनांतील काही संघटना शहरी नक्षलवादाशी संबंधित आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार असतांना वर्ष २०१०, वर्ष २०११, वर्ष २०१३ आणि वर्ष २०१४ मध्ये या संघटना शहरी नक्षलवादी असल्याची माहिती केंद्र सरकारला पाठवण्यात आली होती. संतोष देशमुख हत्याप्रकरणी पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील गुन्हेगारांना सोडले जाणार नाही.’’

धार्मिक स्थळांच्या नियंत्रणाबाबतचा कायदा सर्वांना समान

दरम्यान धार्मिक स्थळांच्या नियंत्रणाबाबतचा कायदा सर्वांना समान असावा. केवळ हिंदूंचीच नव्हे, तर अन्य धर्मियांची धार्मिक स्थळेही नियंत्रणात आणण्याविषयी सरकारने विचार करावा, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना केल्याचे ही फडणवीसांनी सांगितले. तसेच सरकारची यासंदर्भातील भूमिका सांगताना फडणवीस म्हणाले की, मुळात मंदिर आणि अन्य धार्मिक स्थळांवर नियंत्रणासंदर्भात वेगवेगळे कायदे आहेत. मुस्लिमांकरिता वक्फ आहे. काही ठिकाणी ट्रस्ट आहेत, काही ठिकाणी कायदे केलेले आहेत. त्यामुळे आपण त्याच पद्धतीने सध्या चाललो आहोत. विधानसभा अध्यक्षांनी यानिमित्ताने एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे. त्याचा कायदेशीर अभ्यास करावा लागेल, असे फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले.

महायुतीचे खातेवाटप लवकरच होणार

मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन जवळपास आठवडा उलटला तरी खातेवाटप जाहीर झालेले नाही. खातेवाटप नेमक्या कोणत्या कारणांमुळे रखडले आहे. या खातेवाटपासंदर्भात फडणवीस म्हणाले की, मंत्र्यांचे खातेवाटप लवकरच होईल. ते दि. २१ डिसेंबरच्या रात्री किंवा दि. २२ डिसेंबर या दिवशी सकाळीही होऊ शकते, असे सूचक विधान त्यांनी केले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.