DCM Ajit Pawar यांच्याकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचे सांत्वन 

45

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. ऐन हिवाळी अधिवेशन सुरु असताना ही घटना घडल्यामुळे अधिवेशनात यांचे तीव्र पडसाद उमटले. या प्रकरणी उप मुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी शनिवार, २१ डिसेंबरला देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

यावेळी अजित पवार  (DCM Ajit Pawar) यांनी कुटुंबियांचे सांत्वन करताना म्हणाले की, ही घटना खूप वेदनादायी आहे. आम्ही या प्रकरणाची दोन प्रकारे चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. तुमच्यावर मोठा अघात झाला आहे. आता गेलेली व्यक्ती परत येऊ शकत नाही. मात्र, या प्रकरणात ज्यांचे कोणाचे लागेबांधे असतील आणि जो कोणी मास्टरमाईंड असेल त्या कोणालाही आम्ही सोडणार नाही. पोलिसांनी देखील यावर अॅक्शन घेतली आहे.

(हेही वाचा भारत जोडो यात्रेचे नक्षलवाद्यांशी कनेक्शन; काँग्रेस आणि समविचारी पक्षांच्या अंगलट येणार; Pravin Dixit यांचा इशारा)

ग्रामस्थांशी बोलताना अजित पवार म्हणाले… 

संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर गावकऱ्यांशी बोलताना अजित पवार म्हणाले, तुमच्या गावामध्ये जी घटना घडली त्या घटनेचे दु:ख आहे. मी तुम्हाला हा विश्वास देण्यासाठी आलो आहे की, कोणत्याही परिस्थितीत कोणताही राजकीय हस्तक्षेप या प्रकरणात होणार नाही. माझा तुम्हाला शब्द आहे की कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. यामध्ये जो कोणी मास्टरमाईंड आहे, त्यालाही सोडले जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभागृहात आरोपींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेची आम्ही दोन प्रकारे चौकशी करणार आहोत. एक म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माध्यमातून आणि न्यायालयीन चौकशी देखील करणार आहोत. यामध्ये काही त्रुटी राहणार नाहीत याची काळजीही घेतली जाईल, असे आश्वासन अजित पवारांनी  (DCM Ajit Pawar) मस्साजोगच्या ग्रामस्थांना दिले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.