- प्रतिनिधी
शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांच्या भांडुपमधील निवासस्थानाची रेकी करण्यात आल्याची बोंब उठविण्यात आली होती. मात्र राऊत यांच्या निवासस्थानाची रेकी करण्यासाठी नाही, तर मोटारसायकलवरून आलेले दोघे जिओ नेटवर्क टेस्ट ड्राईव्ह करण्यासाठी आले असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय सागर यांनी दिली आहे. (Sanjay Raut Home Reiki)
(हेही वाचा – Theater Tax : शासनाच्या मंजुरीअभावी आजही मुंबईत रंगभूमी कराची जुन्याच दराने वसुली)
शिवसेना उबाठाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे भांडुप पूर्व येथे राहण्यास आहे. शुक्रवारी सकाळी एका मोटारसायकलवरून आलेले दोन संशयित इसम राऊत यांच्या निवासस्थानाची रेकी करून गेले अशी बोंब उठविण्यात आली होती. हे दोघे संशयित राऊत यांच्या मैत्री बंगल्याचे फोटो आणि व्हिडिओ काढून घराची रेकी करण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. दरम्यान आमदार सुनील राऊत यांचे स्वीय सहाय्यक हितेश पटेल यांनी कांजूरमार्ग पोलीस ठाण्याला फोन करून माहिती दिली होती. (Sanjay Raut Home Reiki)
(हेही वाचा – Assembly Winter Session : विधिमंडळाच्या सभागृहाचे कामकाज आठ तासही चालले नाही!)
कांजूरमार्ग पोलिसांनी राऊत यांच्या बंगल्याबाहेरची सुरक्षा वाढवत त्यांच्या घराच्या आसपासच्या सर्व मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरु केली होती. मैत्री बंगल्याच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करत असताना हेल्मेट आणि जॅकेट परिधान केलेले दोन संशयास्पद बाईकस्वार पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असता तपासादरम्यान असे आढळून आले की, सीसीटीव्हीत कैद झालेले संशयित दोघे हे सेलप्लॅन आणि इन्स्टा आयसीटी सोल्यूशन्सचे कर्मचारी होते. ते जिओ मोबाइल नेटवर्कच्यावतीने एरिक्सनसाठी नेटवर्क टेस्ट ड्राइव्ह करीत होते. संबंधित कंपनीने पोलिसाकडे याबाबत खुलासा केला आहे. दरम्यान पोलीस उपायुक्त (परिमंडळ ७) विजय सागर स्पष्ट केले की, ही घटना संशयास्पद नव्हती हा फक्त जिओच्या टीमने केलेल्या नियमित नेटवर्क चाचणी प्रक्रियेचा एक भाग होता. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की काळजीचे कोणतेही कारण नाही. (Sanjay Raut Home Reiki)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community