शहरातील वायू प्रदूषण व ग्रीनहाऊस उत्सर्जनाचा अभ्यास करणे आणि ते कमी करण्यासाठी सक्षम धोरणात्मक आराखडा तयार करण्याकरिता महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रीत) आणि क्रेडाई-एमसीएचआय (CREDAI-MCHI) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. (Mahapreit MoU CREDAI-MCHI)
(हेही वाचा – बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करणार; Devendra Fadnavis यांची रोखठोक भूमिका)
या कराराद्वारे महाप्रीत, विशेषत: मुंबई मेट्रो पॉलीटीन रीजन (MMR) मधील इमारत बांधकामाचे व पूर्ण झालेल्या इमारतीमधून होणाऱ्या वायू प्रदूषण व ग्रीनहाऊस गॅसच्या (GHG) उत्सर्जनाचा वैज्ञानिक अभ्यास करेल. या अभ्यासानंतर प्रदूषण कमी करण्यासाठी सक्षम धोरणात्मक आराखडा तयार करणे हे उद्दीष्ट पूर्ण होणार आहे. (Mahapreit MoU CREDAI-MCHI)
(हेही वाचा – शहरी नक्षलवादासंदर्भातील विधेयक Chandrashekhar Bawankule यांच्या समितीकडे)
या सामंजस्य करारावेळी महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी म्हणाले की, हा अभ्यास शहरी वायू प्रदूषणात इमारत बांधकाम उपक्रमामुळे होणारे प्रदूषण तपासण्यासाठी व त्यांचे प्रमाण निश्चित करणे. तसेच योग्य तांत्रिक साधनांचा व व्यवस्थापनाचा वापर करुन हे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय योजना सादर करण्यास उपयुक्त ठरेल. या अभ्यास अहवालात शिफारस करण्यात आलेल्या बाबींमुळे हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर कमी करण्यास निश्चितपणे यश येईल. (Mahapreit MoU CREDAI-MCHI)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community