Pakistan मधील मंदिरांचे होत आहेत मदरसे आणि हॉटेल; ४२८ पैकी आता राहिली फक्त २२ मंदिरे

67
Pakistan मधील मंदिरांचे होत आहेत मदरसे आणि हॉटेल; ४२८ पैकी आता राहिली फक्त २२ मंदिरे
Pakistan मधील मंदिरांचे होत आहेत मदरसे आणि हॉटेल; ४२८ पैकी आता राहिली फक्त २२ मंदिरे

भारताची फाळणी होण्यापूर्वी पाकिस्तानच्या भागात ४२८ हिंदू मंदिरे होती; परंतु फाळणी झाल्यानंतर १९९० च्या दशकापर्यंत ४०० हून अधिक मंदिरे रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, सरकारी शाळा किंवा मदरसे यांमध्ये रूपांतरित झाली आहेत. आता पाकिस्तानात (Pakistan) केवळ २२ हिंदु मंदिरे उरली आहेत आणि त्यांपैकी सर्वाधिक ११ सिंध प्रदेशात आहेत, असे वृत्त ‘पांचजन्य’ या नियतकालिकाने दिले आहे.

(हेही वाचा – Mumbai Pollution : मुंबईतील प्रदूषणाचा मुद्दा गंभीर, हायकोर्टाकडून स्युमोटो याचिका दाखल)

हॉटेल, शाळा, तसेच मदरशांमध्ये रूपांतरित

पाकिस्तानमधील (Pakistan) ४०८ हिंदू मंदिरे तेथील इस्लामी शासनकर्त्यांमुळे हॉटेल, शाळा तसेच मदरशांमध्ये रूपांतरित झाली आहेत. पाकिस्तानच्या पख्तूनख्वा प्रांतातील हिंदू मंदिरे (Hindu Temples) तेथील इस्लामी कट्टरवाद्यांकडून पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहेत. या प्रांतात फक्त ३ मंदिरे शिल्लक आहेत. पाकिस्तानच्या सिंधमध्ये सर्वाधिक ११ मंदिरे आहेत. तर पंजाबमध्ये ४ (Punjab), पख्तूनख्वामध्ये ४ (Khyber Pakhtunkhwa) आणि बलुचिस्तानमध्ये ३ मंदिरे आहेत. वर्ष २०२० मध्ये पाकिस्तानात १३०० वर्षे जुने प्राचीन मंदिर सापडले. हे पुरातन मंदिर भगवान विष्णूचे असल्याचे सांगण्यात येते. पाकिस्तानात हिंदूंची लोकसंख्या ३८ लाख आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.