Weather Update: राज्यात थंडीची लाट! रविवारी मुंबईची स्थिती काय ? 

65

राज्यातील तापमानात (Mumbai temperature) सातत्यानं चढ उतार होत आहे. कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे.यामध्ये मुंबईसह (Mumbai weather) कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात २४ डिसेंबरपर्यंत पहाटे पाचचे किमान तापमान सरासरीपेक्षा १ ते ४ अंशाने अधिक असल्यामुळे तेथे माफक थंडी जाणवत आहे, तर मुंबईसह कोकणात (Konkan Climate) मात्र हेच तापमान सरासरीपेक्षा १ ते २ अंशाने खालावले आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात, उर्वरित महाराष्ट्राच्या मानाने तेथे अधिक थंडी आहे. मुंबईचे किमान तापमान १९ अंश असून, रात्रीसह पहाटेच्या वातावरणातील गारवा कायम आहे. (Weather Update)

 (हेही वाचा – Mumbai Pollution : मुंबईतील प्रदूषणाचा मुद्दा गंभीर, हायकोर्टाकडून स्युमोटो याचिका दाखल)

२५ ते २९ डिसेंबरदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात, भाग बदलत ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. २६ ते २८ डिसेंबरपर्यंतच्या तीन दिवसांत पावसाची शक्यता अधिक आहे. त्यामुळे दरवर्षी नाताळला जाणवणारी तीव्र थंडी ढगाळ वातावरणामुळे अनुभवता येणार नाही. ३० डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.