Taj Mahal भेटीपेक्षा ‘या’ वारीला भारतीयांची जास्त पसंती 

182

परदेशी लोकांसाठी भारतातलं मुख्य आकर्षण असतं ते ताजमहाल. भारतात येणाऱ्या सर्वाधिक विदेशी पर्यटकांची पसंती ही ताजमहाललाच असते. शुभ्र संगमरवरातली ही वास्तू म्हणजे मुघलकालीन वास्तूरचनेचा (Mughal architecture) एक अप्रतिम नमुना आहे. त्यामुळेच जगातील आश्चर्यांमध्येही ताजमहालचा समावेश होतो. मात्र याच भाविकांनी अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीसोबत उत्तर प्रदेशने पर्यटकांना आकर्षित करण्याच्या बाबतीत नवीन विक्रम स्थापित केले आहेत. यंदा जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान ४७.६१ कोटी पर्यटकांनी उत्तर प्रदेशातील विविध स्थळांना भेट दिली. या ९ महिन्यांत पर्यटकांच्या भेटीबाबत जगप्रसिद्ध ताजमहालसह राज्यातील विविध पर्यटन स्थळांमध्ये अयोध्या आघाडीवर राहिले.  (Taj Mahal)

उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागानुसार यंदा सप्टेंबर महिन्यापर्यंत अयोध्येला १३.५५ कोटी देशाअंतर्गत आणि ३,१५३ विदेशी पर्यटकांनी भेट दिली. यंदा झालेल्या राम मंदिराच्या उ‌द्घाटनामुळे पर्यटकांची संख्या वाढल्याचे सांगितले जात आहे. अयोध्येच्या तुलनेत आग्ग्राला १२.५१ कोटी पर्यटकांनी भेट दिली. यामध्ये देशातील ११.५९ कोटी आणि विदेशातील ९२.४ लाख पर्यटकांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशने गतवर्षी ४८ कोटी पर्यटकांचे स्वागत केले होते. तसेच अयोध्याशिवाय दुसऱ्या अध्यात्मिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ नोंदविण्यात आली आहे.

(हेही वाचा – Mumbai Boat Accident : अपघातग्रस्त बोटीचा प्रवासी परवाना अखेर रद्द)

यामध्ये वाराणसीला ६.२ कोटी देशांतर्गत आणि १.८४ लाख विदेशी पर्यटकांनी भेट दिली. मथुरेला भेट देणाऱ्या ६.८ कोटी पर्यटकांमध्ये ८७,२२९ विदेशी पर्यटकांचा समावेश होता. कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध प्रयागराजला ४.८ कोटी आणि मिर्जापुरला १.१८ कोटी पर्यटकांनी भेट दिली. शिवाय पर्यटन व आदरातिथ्य क्षेत्रामध्ये २०३४ पर्यंत ६१ लाख नवीन रोजगार तयार होण्याचा आशा व्यक्त केला जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे देशातील पर्यटन क्षेत्रात चांगली वाढ दिसून येत आहे. देशाच्या एकूण रोजगार क्षेत्रात पर्यटन क्षेत्राचा जवळपास ८ टक्के वाटा आहे. यंदा फक्त ९ महिन्यांतच राज्याने मोठा पल्ला गाठल्याचे उत्तर प्रदेशचे पर्यटनमंत्री जयवीर सिंह यांनी म्हटले.

हेही पाहा –


Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.