Ravindra Jadeja : विराटनंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने रवींद्र जडेजाला केलं ‘टार्गेट

48
Ravindra Jadeja : विराटनंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने रवींद्र जडेजाला केलं 'टार्गेट
Ravindra Jadeja : विराटनंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने रवींद्र जडेजाला केलं 'टार्गेट

चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया मेलबर्नला पोहोचली असून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर तयारी सुरू केली आहे.बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये मालिका अजूनही १-१ अशी बरोबरीत असल्याने निराश झालेल्या ऑस्ट्रेलियन मीडियाने भारतीय खेळाडूंना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. विराट कोहलीनंतर आता जडेजा ऑस्ट्रेलियन मीडियाच्या निशाण्यावर आला आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाने जाडेजावर आरोप केला आहे की भारतीय स्टारने पत्रकार परिषदे दरम्यान त्यांच्या प्रश्नांची अपेक्षित पद्धतीने उत्तरे दिली नाहीत. (Ravindra Jadeja)

(हेही वाचा- काँग्रेसने डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूनंतरही त्यांची अवहेलना केली; Eknath Shinde यांनी विधान परिषदेत दिले लेखी दाखले)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटी खेळवली जाणार आहे. याआधी रवींद्र जडेजा पत्रकार परिषदेत सहभागी झाला. यावेळी रवींद्र जडेजा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होता, पण त्याने हिंदीतून उत्तर दिल्याने ऑस्ट्रेलियन पत्रकार भडकले.जडेजासोबत गैरवर्तवणूक करू लागले. पत्रकार परिषदेत जडेजाने आमच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ऑस्ट्रेलियन मीडियाने केला आहे. पण, Channel 7 ने जडेजावर इंग्लिशमध्ये उत्तर देत नसल्याचे आरोप केले. संघ व्यवस्थापनाने आम्हाला पत्रकार परिषदेत बोलवले होते, असे ऑस्ट्रेलियाच्या मीडियाचे म्हणणे होते. पण, त्यांना भारतीय पत्रकारांनंतर उत्तर दिली जाईल, असे अपेक्षित होते. त्यामुळे जडेजाने आधी हिंदीत उत्तरं दिली. पण, ऑस्ट्रेलियाच्या मीडियाचे वागणे पाहून जडेजाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. यावेळी कसोटी मालिका कव्हर करण्यासाठी गेलेल्या भारतीय पत्रकारांनी जडेजाच्या वागण्याचा बचाव करत ऑस्ट्रेलियन मीडियाचे दावे फेटाळून लावले आहे.तसेच खेळाडूला त्याच्या भाषेत व्यक्त होण्यास काहीच हरकत नाही, ऑसी मीडियाने हिंदीचे इंग्रजीत भाषांतर करून घ्यावे, असे भारतीय पत्रकारांचे म्हणणे आहे. (Ravindra Jadeja)

(हेही वाचा- Cyber Crime: सावधान! सायबर गुन्हेगार करत आहेत सरकारी विभागांना लक्ष्य; पाच वर्षांतील टक्केवारी आली समोर)

काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहलीचा एका महिला पत्रकाराशी वाद झाला होता. ब्रिस्बेनमधील तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर टीम इंडिया मेलबर्नला रवाना झाली. त्यानंतर विराटची मेलबर्न विमानतळावर एका महिला पत्रकाराशी बाचाबाची झाली. नेहमीप्रमाणे विराटला आपल्या मुलांना मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून लपवायचे होते. पण ऑस्ट्रेलियन मीडियाने त्याची छबी कॅमेऱ्यात कैद केल्याचा विराटला संशय आला. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियन मीडियाला ठणकावले होते.त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाच्या मीडियाने रवींद्र जडेजाबाबत चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. (Ravindra Jadeja)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.