एआयएमआयचे माजी खासदार Imtiaz Jalil यांच्याविरोधात एफआयआर; तर ‘या’ प्रकरणांमुळे 30 आंदोलकांवर गुन्हे दाखल

319
एआयएमआयएमचे (AIMIM) ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यासह अन्य काही नेत्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्यासह आणि त्यांच्या 30 समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या विरोधाशी संबंधित आहे. एमआयएमच्या वतीने आंदोलन करताना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि गाढवाचा वापर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. (Imtiaz Jalil)

अमित शाह (Amit Shah) यांनी संसदेत बोलताना, आंबेडकरांचे (Amit Shah Ambedkarism) नाव घेणे ही एक फॅशन झाली आहे. सगळीकडे आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, म्हणायचे. त्यांनी देवाचे नाव इतक्या वेळा घेतले असते, तर स्वर्गात जागा मिळाली असती, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर वातावरण चांगलेच तापल्याचे पहायला मिळाले. अमित शाह यांच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. एमआयएमच्या वतीने देखील छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे आंदोलन करण्यात आले होते.
(हेही वाचा –स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या तीन महिन्यांत ?; CM Devendra Fadnavis यांचे वक्तव्य चर्चेत )
आंदोलनात गाढवाचा वापर
एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी अमित शाह यांच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर येथे तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात (Imtiaz Jalil Movement) गाढवाचा वापर करण्यात आला होता. ज्यामुळे पोलिसांनी यावर आक्षेप घेत 30 आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. आंदोलकांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.