Kanpur मध्ये बंद असलेली १२० मंदिरे आढळली; काही मंदिरात आता बिर्याणीचे दुकान तर…

99
Kanpur मध्ये बंद असलेली १२० मंदिरे आढळली; काही मंदिरात आता बिर्याणीचे दुकान तर...
Kanpur मध्ये बंद असलेली १२० मंदिरे आढळली; काही मंदिरात आता बिर्याणीचे दुकान तर...

मुस्लिमबहुल भागात अनेक वर्षांपासून बंद असलेली हिंदू (Hindu) मंदिरे मुक्त करण्याची मोहिम आता कानपूरपर्यंच पोहचली आहे. कानपूरमधील (Kanpur) महापौरांनी दि. २१ डिसेंबर रोजी पोलिस बंदोबस्तासह शहरातील वेगवेगळ्या ५ मंदिरांना भेटी दिल्या. या मंदिरांच्या अवस्थेवरही महापौरांनी नाराजी व्यक्त केली. या मंदिरांच्या परिसरात बिर्याणी विकली जात होती. मात्र आता तिथे साफसफाई सुरु करण्यात आली असून दररोज मंदिरात पूजा- अर्चना केली जाणार असल्याची माहिती आहे. अशी अतिक्रमणग्रस्त मंदिरांची संख्या १०० हून अधिक असल्याचे सांगण्यात येते. मात्र प्रशासनाच्या कारवाईनंतर मुस्लिम पक्षाने स्वत:ला अतिक्रमणकारी नसून मंदिराचे रक्षक असल्याचे सांगितले आहे. (Kanpur)

( हेही वाचा : खालसा पंथाची स्थापना करणारे शिख धर्मगुरु Guru Gobind Singh यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास तुम्हाला माहिती आहे का ?

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बेकनगंजच्या राम जानकी मंदिराच्या मागे राहणारा नफीस म्हणतो, “तुम्हाला हवे तसे मंदिर उघडा. याच्याशी आमचा काय संबंध? मंदिर वेगळे, घर वेगळे. हा परिसर पूर्वी जुना सराफा खाण होता. येथे सर्व हिंदू (Hindu) बांधव राहत होते. नंतर ते हिंदूबहुल भागात गेले. मंदिर सर्वत्र खचाखच भरलेले आहे. आम्ही मंदिरांची काळजी घेतो. ९२ च्या दंगलीत सर्वत्र मंदिरांची तोडफोड झाली. मात्र या मंदिराची आम्ही रक्षा केली.”(Kanpur)

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २१ डिसेंबर रोजी कानपूरच्या (Kanpur) महापौर प्रमिला पांडे (Pramila Pandey) ७ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस दलासह मुस्लिमबहुल क्षेत्रात बेकनगंजमध्ये पोहचल्या. बेकनगंज या परिसरात जून २०२२ मध्ये भाजपा नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या विधानाच्या निषेधार्थ मुस्लिम जमावाने पोलिसांवर हल्ला केला होता. दरम्यान या भागातील अनेक मंदिरांत अवैध कामे सुरु असल्याची माहिती प्रमिला पांडे (Pramila Pandey) यांना मिळाली. त्यामुळेच त्या तिथे गेल्या. (Kanpur)

अवघ्या ३० मिनिटांत प्रमिला पांडे (Pramila Pandey) यांनी अशी एकूण ५ मंदिरे शोधून काढली जी बेकायदेशीर कामाची बळी ठरली आहेत. यामध्ये राम जानकी मंदिर पहिल्या क्रमांकावर आहे. हे मंदिर कानपूर २०२२ च्या हिंसाचारातील मुख्य आरोपी मुख्तार बाबा बिर्याणी वाले यांच्या ताब्यात होते. मंदिराच्या मागे बिर्याणी बनवली होती. . स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, १०० स्क्वेअर यार्डमध्ये पसरलेल्या या मंदिराचा फारच छोटासा भाग आता शिल्लक आहे.
दुसरे मंदिर राधाकृष्णाचे आहे. हे मंदिर अतिशय जीर्ण अवस्थेत सापडले. या परिसरात महादेव शिवाचे तिसरे मंदिर सापडले. मंदिरात फक्त शिवलिंगाचे अवशेष सापडले. मंदिराच्या मागे निवासी वस्त्या आहेत. शिवमंदिरानंतर महापौर आणि सोबतच्या प्रशासकीय पथकाला दुसरे राधा-कृष्ण मंदिर सापडले. या मंदिराचे दरवाजे बंद आढळून आले. बंद दरवाजे उघडले असता आत कचऱ्याचा ढिगारा आढळून आला. महापौर प्रमिला यांनी सर्व बेकायदा अतिक्रमणधारकांना तात्काळ हटवण्याचा आदेश दिले आहेत.

मंदिराची दुदर्शा पाहून त्यांना राग आल्याचे ही पांडे (Pramila Pandey) म्हणाल्या.सर्व मंदिरांची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे नूतनीकरण करून पूर्वीप्रमाणे विधीवत पूजा केली जाणार असल्याची माहिती महापौरांनी दिली आहे. महापौर प्रमिला पांडे (Pramila Pandey) यांनीही मंदिरात बसवण्यात आलेल्या मूर्ती कुठे गेल्या, याची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले. कानपूर महानगरपालिकेच्या सर्वेक्षणानुसार शहरातील मुस्लिम भागात जवळपास १२० मंदिरे बंद आहेत. प्रशासनाच्या या कारवाईनंतर मुस्लीम पक्षकारांनी स्वत:ला अतिक्रमणकर्त्यांऐवजी मंदिरांचे रखवालदार म्हणू लागले आहे. (Hindu)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.