- जयेश मेस्त्री
रमाकांत आचरेकर (Ramakant Achrekar) सरांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात बालपणीचे मित्र सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विनोद कांबळी (Vinod Kambli) यांची भेट झाली. बालमित्र विनोदला पाहुन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुढे जात विनोदची भेट घेतली. मात्र विनोद कांबळीने (Vinod Kambli) तेंडुलकरला पहिल्यांदा ओळखलं नाही. सचिनने ओळख सांगितल्यावर त्याला ओळख पटली. इतकी वाईट अवस्था एका चांगल्या खेळाडूची झालेली पाहुन मन सुन्न झालं. अनेक लोक असं म्हणतात की विनोद सचिनपेक्षा चांगला खेळाडू होता. हे खरं खोटं बाजूला ठेवुया. पण सत्य परिस्थिती अशी की सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यशस्वी झाला आणि विनोद कांबळी (Vinod Kambli) केवळ अपयशी झाला नाही तर तो बरबाद झाला. असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांना मोठं करिअर घडवता आलं नाही. असे अनेक कलाकारही आहेत, ज्यांच्या टॅलेंट असूनही खूप मोठं नाव कमावता आलं नाही. पण यशस्वी न होणं आणि बरबाद होणं यात फरक आहे.
विनोद कांबळीला (Vinod Kambli) पुष्कळ संधी मिळाली. विनोद कांबळीने १२९ फर्स्ट क्लास, १०४ एकदिवसीय आणि १७ टेस्ट सामने खेळले आहेत. १०० एकदिवसीय सामने कमी नसतात. पुढे त्याने राजकारणातही पाऊल ठेवलं. त्याचबरोबर चित्रपट आणि छोट्या पडद्यावरही तो झळकला. त्याने जर ठरवलं असतं तर प्रशिक्षक किंवा कमेंटेटर म्हणूनही त्याचं करिअर घडलं असतं. पण बेशिस्तपणा आणि दारुच्या व्यसनाने त्याने सगळं काही गमावलं.
(हेही वाचा – Migrantion : सर्वांगीण विकासामुळे देशातंर्गत नागरिकांच्या स्थलांतरांत १२ टक्क्यांनी घट; ‘ईएसी-पीएम’ चा अहवाल प्रसिद्ध)
हा सगळा इतिहास समोर असताना सोशल मीडियातून सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) जात पाहुन ज्या प्रकारची टीका होते, ती अतिशय वाईट आहे. सचिन तशस्वी झाला हा काय त्याचा दोष आहे आणि तो जातीमुळे नव्हे तर कर्तृत्व, शिस्त, नम्रपणा इत्यादी अनेक गुणांमुळे यशस्वी झाला. पण विनोदला अपयश आल्यामुळे सचिनची जात काढली गेली. विनोद हा बहुजन समाजातला असल्यामुळे त्याच्यावर अन्याय झाला अशा गोष्टी सोशल मिडियावर फिरु लागल्या. काही डाव्या विचारवंतांना सचिनची श्रीमंती लुलीपांगळी आणि विनोदची गरीबी नेत्रदिपक वाटू लागली. हे तेच विचरवंत आहेत, जे मोठ्या बंगल्यात राहतात आणि यांची मुले परदेशात शिकून स्थायिक झालेली असतात. मात्र इतरांच्या मुलांना भम्रिष्ट करुन रस्त्यावर उतरवायला लागतात. मात्र आपण हिंदुंनी (Hindu) असल्या थिल्लर ओकांच्या नादी न लागता आणि सचिन-कांबली यांच्या जय-पराजयाला जातीची लेबले न लावला सत्य परिस्थिती जाणून घेतली पाहिजे. मुळात ह्या स्वयंघोषित पुरोगाम्यांना विनोद कांबळीबद्दल शून्य दया वाटते. ह्यांना केवळ ह्यांची जातीची पोळी भाजून घ्यायची आहे, जेणेकरुन यांचे दुकान सुरु राहिल. आपली मुले रस्त्यावर उतरतील यांची मुले परदेशात स्थायिक होतील.
म्हणूनच अनादी कालापासून आणि संविधानानुसार हिंदू असलेल्या महान लोकसमुहाने आता यांच्या नादी लागण्यापेक्षा हिंदू (Hindu) म्हणून एकत्र आलं पाहिजे. जातीची भिंत तोडून हिंदुत्वाच्या भगव्या झेंड्याखाली एकवटलं पाहिजे. २०१४ च्या लोकसभा आणि २०२४ च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत आपण हिंदू एकजुटीची ताकद पाहिली आहे. पण ही ताकद, ही एकजूट केवळ निवडणुकीपूरती मर्यादित राहता कामा नये. भारतीयांचा हिंदू (Hindu) हा भाव स्वाभाविक व नैसर्गिक आहे. त्यास ऐतिहासिक पाश्वभूमी आहे, वर्तमान साक्षीदार आहे आणि ही भविष्याची नांदी आहे. त्यामुळे हिंदू (Hindu) असणं यापेक्षा भव्य आणि दिव्य काही नाही. एकीकडे अमृत असेल आणि अमृत मिळवण्यासाठी हिंदुत्व सोडण्याची अट ठेवली असेल तर प्रभू श्रीराम, भगवान कृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारात वाढलेला कोणताही हिंदू अमृताचा त्याग करुन हिंदुत्वाच्या धुळीत आपलं भाग्य मानेल. जातीची भिंत तोडून हिंदू म्हणून नांदेल..
हेही पहा –
Join Our WhatsApp Community