Cold : राज्यातील थंडी होणार गायब; तापमान वाढणार

76

राज्यामधील थंडीची (Cold) लाट आता ओसरू लागल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे.अनेक ठिकाणी किमान तापमानात वाढ झाली आहे; पण राज्यातील गारठा मात्र कायम आहे. पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय असून, उत्तर आणि ईशान्येकडे सरकत आहे. त्यामुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका जरा कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात गेल्या आठडव्यात कडक्याची थंडी (Cold) पडली होती. या थंडीमुळे नागरिक हैराण झाले होते. किमान तापमान प्रचंड घसरले होते. मात्र, आता थंडी कमी होऊ लागली आहे. पण, धुळे, निफाड, जळगाव आणि अहिल्यानगर येथील गारठा अद्याप कमी झालेला नाही. उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्या वर गेल्याने थंडीची लाट कमी झाली आहे. धुळे, निफाड, परभणी कृषी विद्यापीठ येथे किमान तापमान १० अंशांच्या खाली असले तरी उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान15 अंशांच्या पुढे गेल्याचे दिसून आले.किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे. पुण्यासह नाशिक, कोल्हापूर जळगाव जिल्ह्यात थंडीचा (Cold) कडाका कमी झाला आहे. शनिवारपासून पुढील चार दिवस म्हणजे मंगळवार दि. २४ डिसेंबरपर्यंत मुंबईसह कोकण वगळता उर्वरित राज्यात पहाटे पाचचे किमान तापमान भागपरत्वे सरासरीपेक्षा १ ते ४ डिग्री से. ग्रेडने अधिक असल्यामुळे तेथे माफक थंडी जाणवत आहे.

(हेही वाचा Mumbai Airport वरून नोव्हेंबर महिन्यात किती विमान उड्डाणे झाली? आकडा ऐकून अवाक व्हाल…)

उत्तरेकडील थंड (Cold) वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने राज्यात थंडी ओसरली असली तरी हवेतील गारठा टिकून आहे. पश्चिमी प्रकोपाच्या प्रेरित परिणामातून, नाताळ सणात म्हणजे २५ ते २९ डिसेंबर (बुधवार ते रविवार) पाच दिवसांदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात, भाग बदलत, ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यताही जाणवते. त्यातही गुरुवार दि. २६ ते शनिवार दि. २८ डिसेंबरपर्यंतच्या तीन दिवसांत पावसाचीही शक्यता अधिक जाणवते. वर्षाअखेरीस म्हणजे सोमवार दि. ३० डिसेंबरपासून हळूहळू थंडीत (Cold) वाढ होऊन नववर्षाच्या उगवतीला पुन्हा थंडीची अपेक्षा आहे, असे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.