मुंबईत पुन्हा एकदा सलग दुसऱ्या दिवशी रुग्ण संख्या पाचशेच्या आतच राहिली आहे. शनिवारी दिवसभरात ४६६ नवीन रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात ८०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शनिवारी मुंबईत १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अशी आहे आकडेवारी
शुक्रवारी ३५ हजार ३६२ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर, ४४६ नवीन रुग्ण आढळून आले होते. तर शनिवारी ३३ हजार ४८० कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर, ४६६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईमध्ये शनिवारी ८०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, शनिवारपर्यंत ६ हजार ६१८ रुग्णांवर विविध कोविड सेंटर तथा रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. शुक्रवारी जिथे ११ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती, तिथे शनिवारी १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या १२ रुग्णांपैकी ५ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. यामध्ये ७ रुग्ण हे पुरुष, तर ५ रुग्ण या महिला आहेत. मृत्यू पावलेल्यांमध्ये १० रुग्ण हे साठी पार केलेले आहेत. उर्वरित २ रुग्ण हे ४० ते ६० वर्ष वयोगटातील आहेत.
#CoronavirusUpdates
१७ जुलै, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण – ४६६
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ८०६
बरे झालेले एकूण रुग्ण – ७०६०४०
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७%एकूण सक्रिय रुग्ण- ६६१८
दुप्पटीचा दर- ९९३ दिवस
कोविड वाढीचा दर ( १० जुलै ते १६ जुलै)- ०.०७% #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 17, 2021
मुंबईतील रुग्णांचे बरे होण्याचा दर हा ९७ टक्के आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर हा ९९३ दिवसांवर आला आहे. झोपडपट्टी व चाळींमधील सक्रिय कंटेन्मेंटची संख्या सहावर आली आहे. तर इमारतींची संख्या ही ७१ वर आली आहे.
Join Our WhatsApp Community