PM Narendra Modi यांचा कुवेतमधील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान

57
PM Narendra Modi यांचा कुवेतमधील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान
PM Narendra Modi यांचा कुवेतमधील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर आहेत. चार दशकांतील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच कुवेत भेट आहे. यादरम्यान,कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबा यांच्याकडून नरेंद्र मोदी यांना रविवारी ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्‍यात आला आहे.भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना हा २० वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

(हेही वाचा : फिट इंडिया अंतर्गत कोलकता ते चेन्नई Cycle प्रवास; तीन अवलियांनी रामकृष्ण मठात घेतला विसावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांचे दि. २२ डिसेंबर रोजी कुवेतच्या ‘बायान पॅलेस’ येथे औपचारिक स्वागत करण्यात आले आणि त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. कुवेतचे अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी कुवेतला पोहोचले आहेत. गेल्या ४३ वर्षात भारतीय पंतप्रधानांची या आखाती देशाला झालेली ही पहिलीच भेट आहे. यावेळी, कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबाही (Emir Sheikh Meshal Al-Ahmad Al-Jaber Al Sabah) उपस्थित होते.

त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांना ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ (The Order of Mubarak the Great) हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबा यांच्याशी विस्तृत चर्चा केली. या चर्चेत भारत-कुवेत संबंधांना नवीन गती देण्यावर भर देण्यात आला आहे. विशेषत: व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा क्षेत्रात परस्पर गुंतवणूक आणि व्यापारावर चर्चा झाली. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी शनिवारी एका भारतीय समुदायाच्या कार्यक्रमाला संबोधित केले आणि एका भारतीय कामगार शिबिरालाही भेट दिली आहे.

भारत आणि कुवेतमध्ये (Kuwait) शतकानुशतके जुने संबंध आहेत, सागरी व्यापार त्यांच्या ऐतिहासिक संबंधांचा कणा आहे. भारत हा कुवेतच्या प्रमुख व्यापार भागीदारांपैकी एक आहे आणि भारतीय समुदाय हा कुवेतमधील सर्वात मोठा प्रवासी समुदाय आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार १०.४७ अरब अमेरिकी डॉलर इतका होता. कुवेत हा भारताचा सहावा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार आहे, जो देशाच्या तीन टक्के ऊर्जा गरजा पूर्ण करतो.(PM Narendra Modi )

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.