पुण्यातील वाघोलीमध्ये (Wagholi) झालेल्या भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. वाघोली येथील केसनंद फाट्याजवळ पुण्याकडून येणाऱ्या भरघाव बिल्टवेस् इंटरप्राईजेस कंपनीच्या डंपरने (Pune Dumper Accident) फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये मुलांच्या काकांसह दोन बालकांचा समावेश आहे, तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रात्री 12 ते 1 वाजताच्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्यावर पोलीस ठाण्याच्या समोरच ही घडली. (Pune)
(हेही वाचा – लोकसभा, विधानसभा निवडणूक झाली आता Municipal Election केव्हा होणार?)
डंपर क्रमांक MH 12 VF 0437 याच्या चालकाने याने दारू पिलेल्या अवस्थेत फुटपाथवर झोपलेल्या लोकांवर डंपर चढवल, अशी माहिती आहे. आरोपी डंपर चालक गजानन शंकर तोट्रे (वय 26 वर्षे) रा. नांदेड यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला असून वैद्यकीय चाचणी करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वपोनी पंडित रेजितवाड करत आहेत.
वैभवी रितेश पवार ( वय 1 वर्ष ), वैभव रितेश पवार (वय 2 वर्ष), रीनेश नितेश पवार (वय 3) वर्षे अशी मृत्युमुखी झालेल्यांची नावे आहेत. जानकी दिनेश पवार (वय 21 वर्षे), रिनिशा विनोद पवार (वय 18 वर्षे), रोशन शशादू भोसले (वय 9 वर्षे), नागेश निवृत्ती पवार (वय 27 वर्षे), दर्शन संजय वैराळ (वय 18 वर्षे), आलिशा विनोद पवार (वय 47 वर्षे) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
घटना घडली, तेव्हा फूटपाथवर एकूण 12 जण झोपले होते. भरघाव डंपर सरळ फूटपाथवर चढून झोपलेल्यांच्या अंगावर गेला. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community