केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि नंतर पोटनिवडणुकीत त्यांची मोठी बहिण प्रियांका वाड्रा (Priyanka Vadra) यांनी विजय मिळवला. त्यांच्या विजयांवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने ‘राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा यांच्या वायनाडमधील (Wayanad) विजयामागे कट्टरतावादी मुसलमान आघाडीचा हात होता’, असा आरोप केला आहे. सुलतान बाथरी येथे वायनाडमधील माकपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी माकपचे (CPM) नेते विजयराघवन् यांनी हे आरोप केले.
(हेही वाचा – Pune Accident : मध्यरात्री पुण्यात फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडले; तिघांचा जागीच मृत्यू)
‘वायनाडमधून लोकसभेवर २ जण निवडून गेले. पहिले राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि आता प्रियांका वाड्रा (Priyanka Vadra). ते कुणामुळे निवडून आले ? कट्टरतावादी मुसलमान आघाडीच्या पाठिंब्यामुळेच ते वायनाडमध्ये जिंकले. या आघाडीच्या पाठिंब्याविना राहुल गांधी संसदेत पोचू शकले नसते. ते आता विरोधी पक्षनेते आहेत. प्रियांका वाड्रा यांच्या वायनाडमध्ये अनेक प्रचारफेर्या झाल्या. त्यांच्या त्या प्रचारफेर्यांमध्ये सर्वांत पुढच्या आणि मागच्या रांगेत कोण होते, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? अल्पसंख्यांकांमधील सर्वांत वाईट अतिरेकी विचारांचे लोक त्या फेर्यांमध्ये होते. हे अतिरेकी विचारांचे लोक काँग्रेस नेतृत्वासमवेत आहेत.
विजयराघवन् यांनी यापूर्वीही काँग्रेसवर अशा प्रकारचे आरोप केले आहेत. तसेच माकपने वर्ष २०१४ मध्ये अशीच भूमिका घेतली होती. त्या वेळी लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Elections 2024) त्यांनी काँग्रेस आणि कट्टरतावादी मुसलमान संघटना यांचा संबंध जोडला होता. यावर्षी एप्रिल महिन्यातही माकपाने असेच आरोप केले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community