Mumbai BKC : बीकेसीतील ‘मीसिंग लिंक’ वाहतुकीसाठी खुला; वाहतूक कोंडीतून वाहनांना दिलासा

74
बीकेसीतील 'मीसिंग लिंक' वाहतुकीसाठी खुला; वाहतूक कोंडीतून वाहनांना दिलासा
बीकेसीतील 'मीसिंग लिंक' वाहतुकीसाठी खुला; वाहतूक कोंडीतून वाहनांना दिलासा

बीकेसीतील (Mumbai BKC) एमटीएनएल जंक्शन ते बीकेसी कनेक्टरदरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून मिठी नदीच्या किनाऱ्याला लागून मीसिंग लिंक (Missing Link) रोडची उभारणी एमएमआरडीएकडून करण्यात आली आहे. एमटीएनएल जंक्शन ते एमएमआरडीए मैदान यादरम्यान उभारण्यात आलेला मीसिंग लिंक रोड सोमवार, २३ डिसेंबरपासून वाहतुकीसाठी खुला झाला जाणार आहे. ४ कोटी रुपये खर्चुन हा रस्ता उभारण्यात आला आहे.

(हेही वाचा – वायनाडमध्ये Rahul Gandhi आणि Priyanka Vadra यांच्या विजयामागे मुसलमानांचा पाठिंबा; माकपने केली पोलखोल)

हा रस्ता सुमारे २०० मीटर लांबीचा असून, १८ मीटर रुंदीचा आहे. त्यावर प्रत्येकी ३ मार्गिका आहेत. त्यातून या भागातील वाहनांना आणखी एक पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या भागातून वाहनांना सिग्नल फ्री प्रवास करता येईल. यातून एमटीएनएल जंक्शनजवळ होणारी कोंडी टळणार आहे. तसेच त्याचबरोबर पूर्व द्रुतगती महामार्गापासून (Eastern Expressway) येणाऱ्या वाहनांच्या बीकेसीतील प्रवासाच्या वेळेत जवळपास १५ मिनिटांची बचत होणार आहे. हा रस्ता खुला झाल्याने बीकेसी कनेक्टरखालून आणखी एक नवा मार्ग वाहनांना उपलब्ध होणार आहे. तसेच सेबी कार्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना दिलासा मिळेल.

बीकेसी (Mumbai BKC) भागात मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यासाठी जागोजागी रस्ता अडविण्यात आला आहे. त्यातूनही कोंडीत भर पडते. गर्दीच्या वेळी १ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी ८ ते १० मिनिटांचा कालावधी लागतो.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.